लायसन्ससाठी आता आॅनलाईन अपॉइन्टमेन्ट
By Admin | Updated: August 13, 2014 00:52 IST2014-08-13T00:22:05+5:302014-08-13T00:52:16+5:30
उस्मानाबाद : नागरिकांना लायसन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायदयानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते,

लायसन्ससाठी आता आॅनलाईन अपॉइन्टमेन्ट
उस्मानाबाद : नागरिकांना लायसन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायदयानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते, त्यासाठी नागरिकांना कार्यालयात तासनतास रांगेत उभे राहवे लागत होते. नागरिकांचा हा वेळ आता वाचणार आहे. लायसन्स काढण्यासाठी आॅनलाईन फॉर्म भरुन अपॉइन्टमेन्ट घेतल्यास लगेच लायसन्स काढता येणार असून, याची सुरुवात जिल्ह्यात १९ आॅगस्ट पासून होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रैवार यांनी दिलीे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे ओरिएंट कन्सल्टन्सी यांनी विकसित केलेली शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रणाली सुरु करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी नागरिकांना परिवहन कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परिक्षा द्यावी लागत होती. मात्र आता दैनंदिन कामकाजात जे उमेदवार शिकावू अनुज्ञप्तीसाठी अपॉइंटमेट सह हजर राहतील, त्यांचे करिता रांगेत प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांनी लायसन्स काढण्यासाठी आॅनलाईन फॉर्म भरला आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. क्षमतेच्या ५० टक्के उमेदवार संख्या ही आॅनलाईन अपॉइटमेंटसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सदर पध्दत जनतेमध्ये रुळल्यानंतर हळृूहळू आॅनलाईन अपाँइटमेंटसाठी ९० टक्के पर्यंत उमेदवारसंख्या वाढविण्याच्या सूचना प्रधान सचिव परिवहन यानी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आॅनलाईन लायसन्स सेवेचा प्रारंभ १९ आॅगस्ट पासून करण्यात येणार असल्याचे संजय म्हेत्रैवार यांनी सांगितले. एनआयसी कार्यालयाने परिवहन कार्यालय संपूर्णपणे आॅनलाईन केल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)