आता लातूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे लक्ष

By Admin | Updated: October 28, 2014 00:59 IST2014-10-28T00:10:19+5:302014-10-28T00:59:02+5:30

आशपाक पठाण , लातूर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच दिवाळी अन् निवडणुकीच्या विजयाचे फटाके फुटले.

Now look at the choice of Mayor of Latur Municipal Corporation | आता लातूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे लक्ष

आता लातूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे लक्ष


आशपाक पठाण , लातूर
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच दिवाळी अन् निवडणुकीच्या विजयाचे फटाके फुटले. आता दिवाळी सणाचा उत्साह ओसरत चालला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरांची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेचा नवा महापौर कोण? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे बहुमत असलेल्या महापालिकेत १३ नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी चर्चा रंगल्या आहेत.
लातूर शहर महानगरपालिकेतील महापौर स्मिता खानापुरे व उपमहापौर सुरेश पवार यांचा कार्यकाल २० नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे नव्या महापौर व उपमहापौरांची निवड २० नोव्हेंबरच्या अगोदर किंवा पुढील दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीअगोदरच महापौरांचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे विधानसभेपूर्वी लातूरच्या महापौर पदाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लातूर शहर महापालिकेत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. ७० पैकी ५० नगरसेवक काँग्रेसचे आहेत. मनपाची बहुतांश सूत्रे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याच हाती आहेत. त्यांच्याकडूनच महापौर व उपमहापौर दोन्ही पदांच्या नावावर शिक्कामोर्तब होतील. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी मंत्री अमित देशमुख यांनी ओबीसी नगरसेवकांमध्ये मताधिक्यांची स्पर्धा लावली होती. ज्या प्रभागातून काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, त्या प्रभागातील ओबीसी नगरसेवकाचा महापौर पदासाठी विचार होईल, अशी शक्यता वर्तविली होती. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रात्रीचा दिवस करून आपलाच प्रभाग कसा काँग्रेसला प्लस राहील, यासाठी धावपळ केली.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच प्रभागनिहाय मतांची चर्चाही रंगली आहे. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर प्रभागनिहाय मताधिक्यांची आकडेवारी आता फिरू लागली आहे.
दिवाळीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अमित देशमुख यांच्या विजयाचे फटाके फुटल्यावर आता चर्चा रंगली आहे ती लातूरच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार?

Web Title: Now look at the choice of Mayor of Latur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.