शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

आता डोळ्यांसमोर काजवे चमकतच नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:02 IST

मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याचा सुरुवातीचा काळ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी पर्वणीच. खंडाळा घाट, भंडारदरा, अकोले तालुका, सातारा, ...

मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याचा सुरुवातीचा काळ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी पर्वणीच. खंडाळा घाट, भंडारदरा, अकोले तालुका, सातारा, सांगलीचा काही भाग म्हणजे लखलखत्या काजव्यांचे नंदनवन. या दिवसांमध्ये हा प्रांत रात्रीच्या वेळी काजव्यांच्या लकाकणाऱ्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो. हे अवर्णनीय दृश्य पाहण्याच्या ओढीने याकाळात हजारो पर्यटक पश्चिम महाराष्ट्र गाठतात आणि काजवा महाेत्सवाचा आनंद घेतात.

काजवे हे प्रामुख्याने जास्त आर्द्रता असणाऱ्या प्रदेशात दिसतात. परंतु मराठवाड्यातही काही वर्षांपूर्वीपर्यंत काजव्यांच्या काही जाती अगदी सहज दिसायच्या. पण रासायनिक खतांची फवारणी, वृक्षतोड, घटलेले पर्जन्यमान, वाहने तसेच कारखान्यांमधून येणारे दूषित वायू या गोष्टी काजव्यांना मराठवाड्यापासून दूर घेऊन गेल्या आहेत. आता सध्या जिथे काजवे दिसतात, त्या प्रांतात तरी रसायनांचा वापर कमी करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी करत आहे.

चौकट :

काजवे का चमकतात ?

काजवा हा कीटक वर्गात येतो. काजव्याच्या शेपटीखाली असणाऱ्या अवयवात ल्युसिफेरीन नावाचा द्रव पदार्थ असतो. नायट्रीक ऑक्साईड, कॅल्शियम यांच्या मदतीने ल्युसिफेरीनची ऑक्सिजनसोबत प्रक्रिया होते आणि काजवे प्रकाशमान होतात. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि अन्नाच्या शोधासाठी नर आणि मादी दोघेही प्रकाशमान होत असतात. काजव्यांचे अनेक प्रकार असून या प्रकारानुसार त्यांचा प्रकाशही पांढरा, पिवळा, हिरवा, केशरी अशा विविध रंगात पडत असतो.

चौकट :

रासायनिक खतांचा बेसुमार वापर

कोरडे हवामान असतानाही काही वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर काजवे दिसायचे. शहरी भागातही अनेकांनी काजव्यांचे चमकणे पाहिले आहे. परंतु आता मात्र ग्रामीण भागातही क्वचितच काजवे चमकताना दिसतात. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे शेतीसाठी रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर. काजवे, मधमाशा यांच्यासह अनेक कीटकांवर रासायनिक खतांच्या माऱ्याचा वाईट परिणाम झाला आहे. काजव्यांचे न दिसणे म्हणजे रसायनांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढल्याचे सूचक आहे.

- डॉ. सतीश पाटील, पर्यावरण अभ्यासक