आता कर्मचार्यांच्या ‘टीडीएस’वर डल्ला?
By Admin | Updated: May 28, 2014 01:13 IST2014-05-28T00:49:14+5:302014-05-28T01:13:40+5:30
औरंगाबाद : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या टीडीएसवर डल्ला मारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आस्थापनेवरील १,६०० कर्मचार्यांच्या टीडीएस कपातीबाबतही असाच प्रकार घडल्याची शंका प्रशासनाला आहे.

आता कर्मचार्यांच्या ‘टीडीएस’वर डल्ला?
औरंगाबाद : महापालिकेने शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या टीडीएसवर डल्ला मारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आस्थापनेवरील १,६०० कर्मचार्यांच्या टीडीएस कपातीबाबतही असाच प्रकार घडल्याची शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या प्रकरणी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ३१ मार्चपर्यंत मनपाने सर्व कर्मचार्यांचा टीडीएस भरणा केला आहे. गेल्या वर्षीच्या टीडीएसमध्ये ही हेराफेरी करण्यात आली आहे. शिक्षकांच्या वेतनातून टीडीएस कपात केला. मात्र, आयकर विभागाला ती रक्कम न भरता आठ महिने कंत्राटदारांची बिले देण्यासाठी बिनधास्त वापरल्याने शिक्षण विभागाला ५ लाख ५४ हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली. सुमारे ९० लाख रुपये आठ महिन्यांत शिक्षकांच्या वेतनातून कपात केले; परंतु ती रक्कम लेखा विभागाने आयकर विभागाला वळती केली नाही. आयुक्त म्हणाले... ५४३ शिक्षकांच्या वेतनातून टीडीएस कपात झाला. मात्र, आयकर विभागाला जमा न करण्याप्रकरणी मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपर्यंत मनपातील सर्व कर्मचार्यांचा टीडीएस भरण्यात आलेला आहे. उघडकीस आलेले प्रकरण मागील वर्षाचे आहे. १,६०० कर्मचार्यांच्या बाबतीतही माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असे आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले. टीडीएस देणारे कर्मचारी- १,६०० एकूण वेतन अंदाजे- ६ कोटी रुपये देय वेतन अंदाजे- ३ कोटी रुपये टीडीएस कपात- ३० लाख दरमहा