आता ढोल-ताशांची दुमदुमणार धुमशान!
By Admin | Updated: September 20, 2015 01:11 IST2015-09-20T00:54:27+5:302015-09-20T01:11:03+5:30
औरंगाबाद : ‘लोकमत’ व ‘श्री गणेश महासंघ उत्सव समिती’तर्फे आयोजित ‘ढोल-ताशा’ स्पर्धेचा दिवस जसाजसा जवळ येत आहे तसा ढोल पथकांचा सराव अधिक तीव्र झाला आहे.

आता ढोल-ताशांची दुमदुमणार धुमशान!
औरंगाबाद : ‘लोकमत’ व ‘श्री गणेश महासंघ उत्सव समिती’तर्फे आयोजित ‘ढोल-ताशा’ स्पर्धेचा दिवस जसाजसा जवळ येत आहे तसा ढोल पथकांचा सराव अधिक तीव्र झाला आहे. गजमुख गजाननाला पारंपरिक वाद्यांच्या निनादात खुश करण्यासाठी गणेश मंडळे सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर ‘ढोल-ताशा’ स्पर्धेच्या निमित्ताने जमणार आहेत. आता बस एक दिवस जाणे बाकी आहे.
आतापर्यंत ५० पेक्षा अधिक ढोल पथकांनी नोंदणी केली असून, स्पर्धेच्या नावनोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या लक्षात घेता स्पर्धा खूपच चुरशीची होणार यात काही शंकाच उरली नाही. शहराच्या कुठल्याही भागात गेले असता कोणते ना कोणते ढोल पथक जय्यत तयारी करताना दिसत आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण ढोल आणि ताशावर मेहनत घेत आहेत. त्यांच्या परिवारातील सदस्य आणि मित्रमंडळीसुद्धा आपले पथकांना साथ देत आहेत.
विशेष बाब म्हणजे केवळ शहरातीलच नव्हे, तर इतर शहरांतील ढोल पथकांनीसुद्धा स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पुणे- मुंबई- नाशिकच्या प्रसिद्ध मंडळांनी स्पर्धेत उतरण्यासंबंधी चौकशी केली आहे. त्यामुळे स्पर्धेला आता ग्रँडस्वरूप प्राप्त झाले आहे. मंडळांद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सामाजिक संदेशांवर या स्पर्धेत विशेष भर दिला जाणार आहे. ताल, लय आणि ठेक्याबरोबरच पथकांचा गणवेश, शिस्त आणि समन्वय यांचासुद्धा स्पर्धेच्या वेळी विचार करण्यात येणार आहे. या उत्साहाने साजरा करण्यासाठी ‘ढोल-ताशा’ स्पर्धेत सामील व्हा आणि नागरिकांनीसुद्धा कधी न अनुभवलेल्या जंगी महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता जि.प. मैदानावर हजर राहावे.
रोख बक्षिसे
स्पर्धेत सहभागी संघांना आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.
प्रथम बक्षीस : २५ हजार रुपये
द्वितीय बक्षीस : १५ हजार रुपये
तृतीय बक्षीस : १० हजार रुपये
सहभागी होणाऱ्या प्रत्येक पथकास सहभागी प्रमाणपत्र मिळणार.
ढोल-ताशा स्पर्धा
दिनांक : २१ सप्टेंबर, २०१५
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थान : जि.प. मैदान, औरंगपुरा, औरंगाबाद.
स्वरूप : प्रत्येक ढोल पथकास १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल
नोंदणीची अंतिम तारीख : २० सप्टेंबर, २०१५
संपर्क: ९०२८३५५५५५, ९७६४९९७२०५, ९८२३१७७०८४
गेल्या दोन महिन्यांपासून कसून सराव करणाऱ्या ढोल पथकांना आता साऱ्या शहरासमोर आपली कला सादर करण्याची संधी ‘ढोल-ताशा’ स्पर्धेच्या निमित्ताने चालून आलेली आहे. ‘डीजे’ धांगडधिंग्यापेक्षा पारंपरिक वाद्यांचा लयबद्ध ठेका काय असतो हे या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांना कळेल. त्यामुळे शहरातील सर्व ढोल पथकांनी त्यांच्या उत्साह द्विगुणित करण्यासाठी या स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदवावा. -संजय बारवाल, अध्यक्ष