शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता पुन्हा गद्दारांचे झेंडे हाती घ्यायला लावू नका; बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:00 IST

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

औरंगाबाद : शिवसेनेत असताना गद्दारी करतात, पुन्हा पक्षात येतात. आता ते गद्दार पुन्हा पक्षात आले, तर त्यांचे झेंडे धरायला आणि सतरंज्या उचलायला लावू नका, असा जोरदार इशारा शिवसैनिकांनी रविवारी शहागंजमधील बाळाजी धर्मशाळेत झालेल्या मेळाव्यात दिला.

मध्य मतदारसंघातील आ. प्रदीप जैस्वाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी हातमिळवणी करीत सरकारमध्ये सामील झाले. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ.अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, बंडू ओक, अनिल पोलकर, मोहन मेघावाले, आनंद तांदूळवाडीकर, राजू पहाडिया, राजू इंगळे यांच्यासह महिला आघाडीच्या प्राजक्ता राजपूत आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिंदे यांच्या गटाला जवळ केले आहे. त्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. गावांत-वॉर्डात अनेकांशी शत्रुत्व घेत पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आणि त्यांनी स्वार्थासाठी बंडखोरी करायची. शिवसैनिकांकडून निष्ठेची अपेक्षा करायची आणि बंडखोरी करणाऱ्यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची, या प्रकारामुळे सामान्य शिवसैनिकांचे अवसान गळाले आहे. 

आ. दानवे म्हणाले, पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत. ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे कार्यालयातील फोटो काढून फेका. त्यांना यापुढे विधानसभा दिसायला नको. शहरप्रमुख बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी कोळशाच्या खाणीतून आणून हिऱ्यासमान आकार दिला. चकाकी मिळाली की, शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राचा गळा या बंडखोरांनी घोटला. ॲड. पहाडिया म्हणाले, यापुढे निष्ठावंतांचा विचार झाला पाहिजे. बंडखोरांविरोधात अनेकांनी भावना व्यक्त करीत एकतेची वज्रमूठ आवळली.

दोन्ही आमदारांवर खैरेंची टीकाशिवसेना नेते खैरे म्हणाले, आ. जैस्वाल यांना दोनवेळा मदत केली. तरीही त्यांनी बंडखोरी केली. आ. संजय शिरसाटांवर टीका करताना खैरे यांनी ‘रिक्षाचालकाकडे इतका पैसा आला कुठून’, असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली, ती सगळी कामे घरच्यांनाच वाटली. एकही काम शिवसैनिकांना दिले नाही. पैसा आयुष्यभर पुरत नाही, असेही खैरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ