आता मुलींना थेट सहामाही बसपास
By Admin | Updated: June 25, 2017 23:40 IST2017-06-25T23:38:42+5:302017-06-25T23:40:19+5:30
हिंगोली : यावर्षीपासून आता मुलींना थेट सहामाही पास वाटप केल्या जाणार आहेत.

आता मुलींना थेट सहामाही बसपास
आता मुलींना थेट सहामाही बसपास
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी पाचवी ते दहावीतील मुलींना अहिल्याबाई होळकर तर आठवी ते बारावी मानव विकास योजनेच्या मोफत प्रवासासाठी बसपास दिल्या जातात. यावर्षीपासून आता मुलींना थेट सहामाही पास वाटप केल्या जाणार आहेत.
ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासासाठी शासनाकडून दरवर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे मोफत बस पासेस वाटप केल्या जातात. गतवर्षी हिंगोली आगारातर्फे ३ हजार ६०० मुलींना योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे. संबंधित शाळेद्वारे आगारप्रमुख यांच्याकडे अर्ज करावे लागतात. त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाते. मोफत प्रवास योजनेचा लाभासाठी विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. शिवाय गावात शाळा उपलब्ध नसल्याचे मुख्याध्यापकाचे तसे प्रमाणपत्र आगार व्यवस्थापकाकडे सादर करावे लागते.
सदर संपूर्ण माहिती शाळेकडून प्राप्त झाल्यानंतर आगारप्रमुख संबंधित विद्यार्थिनींना प्रवासासाठी मोफत पास उपलब्ध करून देतात. जास्तीत जास्त मुलींनी सदर योजनेच्या लाभ मिळावा यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आगाराकडे अर्ज सादर करणे आवश्यक
आहेत.