शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

आता भगतसिंगगिरी सुरु, कुठल्याही क्षणी मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:21 IST

पुणतांबा येथे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा 'शेतकरी संपा'ची हाक देण्याबाबत निर्णय होणार

छत्रपती संभाजीनगर: पक्ष, जातीपातीमध्ये न अडकता आमचा शेतकरी एकत्र आला आहे, हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. सात दिवस उपोषण,आठ दिवस पदयात्रा काढली तरी सरकारला जाग येत नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी आता गांधीगिरी संपली असून यापुढील आंदोलन भगतसिंगगिरीने करू, मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू, असा इशारा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला. शहरातील प्रहारच्या चक्काजाम आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

शेतकरी कर्जमाफी व्हावी, शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, या मागण्यांसाठी प्रहारतर्फे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरात देखील क्रांतीचौक येथे प्रहारने  सकाळपासून भर पावसात आंदोलन सुरु केले. यावेळी कॉंग्रेस, मनसे,एमआयएम आदी पक्षांनी आंदोलनास साथ दिली. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळी येत सरकारवर ताशेरे ओढले. आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू. येथून थेट पुणतांबा येथे जात असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा 'शेतकरी संपा'ची हाक देण्याबाबत निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. आंदोलनानंतर बच्चू कडू पोलिसांच्या स्वाधीन झाले.

आता कुठल्याही क्षणी मंत्रालयात घुसू बच्चू कडू पुढे म्हणाले, निवडणुकीवेळी सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले. आता म्हणत आहेत पिक चांगले आहे. पिक चांगले असले तरी त्याला भाव चांगला नाही, याचा विचार करावा. आमची रास्त मागणी असून सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंदोलनापूर्वी अनेकांना ताब्यात घेतले गेले. अतिशय वाईट पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली. आता गनिमी कावा करून मेंढ्यासह थेट मंत्रालयात घुसू , असा इशारा देत कडू यांनी निर्णायक लढा सुरु झाल्याचे स्पष्ट केले.

पुन्हा शेतकरी संपाची चाचपणीसध्या कृषीमंत्र्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सरकारने तेवढेच प्रयत्न शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी करावेत. शेतकरी मुद्द्यावर अनेक पक्ष आमच्या सोबत आहेत. येथे राजकारण आणू नये, येथे शेतकरी हा विषय महत्वाचा आहे. बनवाबनवीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या हुशारीने करतात. त्यांना असे वाटते की, लोकांना आपण मूर्ख बनवू, एकवेळ तुम्ही आम्हाला मूर्ख बनवा पण शेतकऱ्यांना बनवू नका. कारण शेतकऱ्यांचे हात थांबले तर अन्न मिळणार नाही. त्यामुळे तुम्हीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी कडू यांनी केली.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र