शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

आता दुकान, आस्थापनांना मनपाचा परवाना; सर्वसाधारण सभेसमोर येणार प्रशासकीय प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 19:25 IST

छोट्या व्यापाऱ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारण्याचा तर मोठ्या संस्थांना भरमसाठ शुल्क आकारण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.

औरंगाबाद : महापालिका हद्दीत कोणताही छोटा-मोठा व्यवसायकरायचा असेल, तर यापुढे महापालिकेचा परवाना घ्यावा लागेल. छोट्या व्यापाऱ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारण्याचा तर मोठ्या संस्थांना भरमसाठ शुल्क आकारण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. दरवर्षी परवाना नूतनीकरणासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येईल, असेही प्रस्तावात म्हटले आहे. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 

शहरात लहान-मोठे दोन लाखांहून व्यावसायिक आहेत. हे व्यावसायिक शासनाच्या शॉप अ‍ॅक्ट विभागाकडे नोंदणी करतात. प्रत्येक दुकानात शॉप अ‍ॅक्टचाच परवाना लटकवलेला असतो. आता यापुढे महापालिकेकडूनही परवाना घ्यावा, असा दंडक करण्यात येणार आहे. महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ३१३, ३७६, ३७७, ३७८ व ३६८ नुसार प्रस्ताव तयार केला असून, तो मंगळवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. त्यात नोंदणीसाठी जास्तीत जास्त ३० हजार रुपये आणि कमीत कमी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. दरवर्षी नूतनीकरणासाठी १५ हजारांपर्यंत शुल्क आकारण्यात यावे, असे प्रस्तावात नमूद केले आहे. 

प्रशासनाने २०१४ मध्ये असाच प्रस्ताव सादर केला होता. मात्र, क्षेत्रफळनिहाय व रेडिरेकनर दराने सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर हा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविण्यात आला. दरम्यान, मीरा भाईंदर महापालिकेच्या धर्तीवर आता नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

१०६ प्रकारचे व्यवसाय कारखाने, हॉटेल, अन्न प्रक्रिया, मिठाईची दुकाने, बेकरी, टेलिफोन बुथ, चुना तयार करणे, प्लास्टिक आॅफ पॅरिसपासून वस्तू तयार करणे, बार अँड रेस्टॉरंट, रुग्णालये, उपाहारगृहे, चायनीज सेंटर, खानावळी, आॅईल मिल, लॉजिंग-बोर्डिंग, गुरांचा तबेला, मेडिकल स्टोअर्स, फोटो स्टुडिओ, इलेक्ट्रॉनिक दुकाने, पान टपरी, पिठाची चक्की, दूध डेअरी, शोरूम, कापड दुकाने, किराणा दुकाने, औषधी होलसेलर, टेलरिंग काम करणारे, बँका, आईस्क्रीम पार्लरसह आदी.

व्यापारी महासंघाचा कडाडून विरोधशहरातील व्यापारी विविध कर भरून त्रस्त झाला आहे. नोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महापालिका अगोदरच आमच्याकडून साफसफाई कर, ड्रेनेज कर वसूल करीत आहे. नवीन कचरा उचलण्याचा कर घेणार आहे. आम्ही शहरातील जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यापारी आहोत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा तर करावी. गुपचूप ठराव आणला. कोणताही निर्णय सहमतीनेच घ्यायला हवा.     -जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.

असे राहील नोंदणी शुल्कव्यवसाय                                               नोंदणी शुल्क    नूतनीकरणकारखाने                                                           ७ हजार    ३ हजारफूड प्रोसेसिंग                                            ५ ते ११ हजार    २ ते ५ हजारबार रेस्टॉरंट                                            १५ ते ३० हजार    ७ ते १५ हजाररुग्णालय                                                   ५ हजार ५००    २ हजार ५००उपाहारगृह                                                         ५ हजार    २ हजार ५००लॉजिंग बोर्डिंग                                                ३० हजार     १५ हजारब्युटी पार्लर                                                 १ ते २ हजार    ५०० ते १ हजारगुरांचा तबेला                                            ३ ते १० हजार    १२५० ते ५ हजारइलेक्ट्रॉनिक शोरूम                                 १० ते २० हजार    ५ ते १० हजारवाहनांचे शोरूम                                      १० ते २० हजार    ५ ते १० हजारसोने-चांदी दुकान                                    १० ते २० हजार     ५ ते १० हजारफोटो स्टुडिओ                                              १५००  रुपये    ७५० रुपयेपान टपरी                                                       ५०० रुपये     २५० रुपयेपिठाची गिरणी                                                  ३ हजार     १ हजार

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरbusinessव्यवसाय