शाळांमध्ये वाजणार आता धोक्याची घंटा!
By Admin | Updated: December 25, 2014 00:47 IST2014-12-25T00:43:07+5:302014-12-25T00:47:55+5:30
मुजीब देवणीकर, औरंगाबाद पाकिस्तानातील पेशावरमध्ये सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळांमध्ये वाजणार आता धोक्याची घंटा!
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
पाकिस्तानातील पेशावरमध्ये सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार सीबीएसई शाळांमध्ये आता सुरक्षेचे विविध उपाय योजण्यात येत आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी धोक्याचा इशारा म्हणून अलार्म बसविण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सूचित केले आहे की, अतिरेकी शाळा, मॉल्स, मल्टीप्लेक्स, हॉटेल अशा गजबजलेल्या जागांना कधीही लक्ष्य करू शकतात. शाळांमध्ये हल्ले होऊ नयेत या दृष्टीने सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्लीने आपल्या देशभरातील शाळांना सुरक्षेचे विविध उपाय योजावेत, अशी सूचना दिली आहे. या अध्यादेशात विद्यार्थ्यांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.