शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:26 IST

पोलिस वाहनासमोर हॉर्न वाजवून गैरवर्तन, कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असलेल्या पवन जैस्वाल याने तीन सहकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री (दि. १५) पावणे बाराच्या सुमारास सूतगिरणी चौकात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस अंमलदार फिर्यादी राहुल नरेश चावरिया (रा. गांधीनगर) हे मोटार वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. व्हीआयपी दौरे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ने-आण करण्याचे काम करतात. सोमवारी (दि. १४) त्यांना एसआयडी कार्यालयातून फोन आला. त्यात पोलिस निरीक्षक भालेराव मॅडम यांना बीड येथे तपासासाठी मंगळवारी सकाळी घेऊन जायचे असल्याचा निरोप देण्यात आला. त्याप्रमाणे ते मंगळवारी बीड येथे जाऊन रात्री परत आले. पावणे बाराच्या सुमारास एसआयडी ऑफिसला पोहोचले. तेथून पीआय भालेराव यांना घरी सोडण्यासाठी वाहनाचा अंबरदिवा लावून ते स्नेहनगर येथून निघाले. दर्गा चौक मार्गे जात असताना विभागीय क्रीडा संकुलाजवळ त्यांच्या वाहनासमोर दोन दुचाकींवर चौघे जण हॉर्न वाजवत झिकझॅक पद्धतीने समोर जात होते. चावरिया यांच्या पोलिस वाहनाला पुढे जाण्यासाठी आरोपी रस्ता देत नव्हते.

सूतगिरणी चौकाजवळ चावरिया यांनी त्यांच्या पुढे पोलिस वाहन नेले. तेव्हा चौघेही शिवीगाळ करून थांबण्याचा इशारा करू लागले. चावरिया यांनी वाहन थांबवले. तेव्हा दुचाकीवरून (एमएच २० एफडी ७६०५) पवन जैस्वाल उतरला. त्याने पोलिस वाहनाचा दरवाजा ओढून शिवीगाळ केली. चावरिया यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केली. तेव्हा पवन जैस्वालने फायटरने पोलिस अंमलदार चावरिया यांच्या डोळ्याच्या खाली मारून जखमी केले. अन्य तिघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्याच्या पाठीमागे फायटरने प्रहार केल्याने चावरिया बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा ते आयसीयूमध्ये होते. पीआय भालेराव यांनी त्यांना आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथून सिग्मामध्ये हलविण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करत आहेत.

‘एमपीडीए’ कायद्यानुसार होता कारागृहातपोलिसांच्या वाहनावर हल्ला करून अंमलदाराला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा पवन जैस्वाल हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो ‘एमपीडीए’ कायद्यानुसार हर्सूल कारागृहातून बाहेर आला आहे. पोलिसावर हल्ला केल्यानंतर तो साथीदारांसह फरार झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस