शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज पेडलर अशफाक शेखचे रॅकेट उद्ध्वस्त; आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या मैत्रिणीलाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:40 IST

ड्रग्स तस्करीत पहिल्यांदाच पोलिसांनी आरोपींची ११ बँक खाती गोठवली; १७ दिवसांत रॅकेटमधील दोन महिलांसह एकूण १६ स्मगलर्सला अटक

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली, मुंबई, गुजरात, मध्यप्रदेशमधील स्मगलर्सच्या संपर्कात राहून शहरात अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणारा कुख्यात गुन्हेगार अशफाक शेख इसाक (रा. रवींद्र नगर, शहाबाजार) याचे अमली पदार्थांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारी साथीदार, मैत्रीण इशरत अकिब शेख (२८) हिला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. गेल्या १७ दिवसांत अटक झालेल्या अशफाकच्या प्रत्येक साथीदाराकडून तिच्या बँक खात्यावर पैसे आल्याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

२५ जानेवारी रोजी लातूरहून अशफाकच्या सांगण्यावरून शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ औषधांचा साठा घेऊन आलेल्या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. यात आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कार घालून पसार होण्यापर्यंत मजल मारली. यांना अटक होताच अशफाक रात्रीतून पळून गेला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांनी याची गंभीर दखल घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे यांना या रॅकेटची पाळेमुळे शोधून काढण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या. त्यानंतर १७ दिवसांत रॅकेटचे साथीदार असलेल्या दोन महिलांसह एकूण १६ तस्करांना अटक करून लाखोंचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

दीड महिन्यात ३८३ कॉलवर संपर्क-अशफाकची ड्रग्ज स्मगलिंगची साथीदार व मैत्रीण इशरत अकिब शेख ही त्याच्याच परिसरात राहते. त्यामुळे दोघांचा जुना परिचय आहे. अशफाकच्या सांगण्यावरून ती ड्रग्जचे सर्व खरेदी विक्रीचे आर्थिक व्यवहार सांभाळत होती.-गेल्या दीड महिन्यात ती व अशफाकमध्ये ३८३ कॉलद्वारे संपर्क झाला. बहुतांश वेळी ते व्हॉट्सॲप कॉलचा वापर करत होते. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले असून तिला तीन अपत्ये आहेत. रवींद्रनगरमध्ये ती भावासोबत राहते.-विशेष म्हणजे, अशफाकचे घर व मार्गावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर तिच्या घरात होता. पोलिसांनी तो जप्त केला.

अकरा बँक खाते गोठवलेअटकेतील १६ पैकी ८ आरोपींसोबत इशरतचे थेट व्यवहार निष्पन्न झाले. यासाठी तिने तीन बँक खाते उघडले होते. अटकेदरम्यान त्या खात्यात दीड लाख रुपये रक्कम आढळून आली. तिच्या तीन बँक खात्यांसह अटकेतील ८ आरोपींचे बँक खाते पोलिसांनी गोठवले आहेत.

रॅकेटचे उच्चाटण, १६ जणांना अटक:

२५ जानेवारी : शेख समीर राजासाब (२४, रा. आनंदनगर, लातूर), सय्यद अल्ताफ वहाब (२३, रा. बालाजीचीवाडी, ता. उदगीर, जि. लातूर), उमर अब्दुल साहाब शेख (३६, रा. बुऱ्हाणनगर, लातूर)

२७ जानेवारी : सय्यद शाहिद अली सय्यद इब्राहिम अली (३०, रा. एस. टी. कॉलनी, उदगीर)

२९ जानेवारी : शेख कलीम शेख सरदार (३५), अनिता अविनाश पाचोंदे (२०), अविनाश शेषराव पाचोंदे (२३, तिघे रा. रवींद्रनगर) व शेख मुस्ताक शेख ईसाक (२७, रा. एस. टी. कॉलनी)

३० जानेवारी : सय्यद रहिम सय्यद अन्वर (२६, रा. सिटीचौक परिसर)

४ फेब्रुवारी : ओबेदुल्ला अब्दुल्ला (३२, रा. किराडपुरा), शेख सोफियान शेख नजीर (३४, रा. बायजीपुरा), अब्दुल नावीद खान अब्दुल समी खान (३१, रा. जिन्सी), शेख नावेद शेख हमीद (२५, रा. लेबर कॉलनी) व शेख अय्याज उर्फ शेरु शेख सिराज (४२, रा. किलेअर्क) यांना गुन्हे शाखेने रात्रीतून अटक केली.

७ फेब्रुवारी : शेख आफताब शेख सलीम (१९, रा. भोईवाडा) व शेख इराफ शेख अरशद (रा. अबरार कॉलनी, बीडबायपास)

५१ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त२५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान गुन्हे शाखेने केलेल्या पाच प्रमुख कारवायांमध्ये नशेच्या पातळ औषधांच्या ४७ लाख २० हजार रुपयांच्या ११ हजार ७९९ बाटल्या तर ४ लाख ४४ हजार रुपयांचे ७५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले.

४६ आरोपींचा शोध सुरूअटकेतील १६ आरोपींच्या संपर्कात असलेल्या ४६ पेडलर्सची यादी तयार केली आहे. हे सर्व पेडलर्स शहर सोडून पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरावरही पाळत ठेवली असून अशफाकच्या घरात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद तरुणांचाही शोध सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drug peddler Ashfaq Sheikh's racket busted; accomplice arrested

Web Summary : Ashfaq Sheikh's drug racket dismantled; his associate Ishrat, who managed finances, arrested. Police seized drugs worth lakhs, froze bank accounts, and are searching for other involved peddlers. Sixteen arrested so far.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर