अप्रमाणित बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांना नोटिसा
By Admin | Updated: June 25, 2014 01:06 IST2014-06-25T00:15:57+5:302014-06-25T01:06:19+5:30
जालना : अप्रमाणित आढळून आलेल्या दोन बियाणे कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने उत्पादित सोयाबीन बियाणांचा माल जप्तीसंदर्भात नोटीस बजावली आहे.

अप्रमाणित बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांना नोटिसा
जालना : खरीप हंगामासाठी बाजारात उपलब्ध सोयाबीनच्या बियाणांमध्ये आतापर्यंत अप्रमाणित आढळून आलेल्या दोन बियाणे कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने उत्पादित सोयाबीन बियाणांचा माल जप्तीसंदर्भात नोटीस बजावली आहे. तर महाबीजला ताकिद देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाने सोयाबीन बियाणांची तपासणी करून ८६ नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले होते.
त्यातील ३४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २६ नमुने अप्रमाणित आढळून आले होते. यामध्ये कृषिधन व ईगल या दोन कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली.
अन्य काही कंपन्यांचेही नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी गेलेले आहेत.
मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. मात्र हे अहवाल लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती कृषी विस्तार अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. (प्रतिनिधी)