शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या बीओंना नोटिसा
By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T00:32:15+5:302014-08-02T01:43:33+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील जि.प. शाळांना दिलेले संगणक कुठे गोदामातच तर कुठे नुसतेच टेबलवर ठेवून धूळखात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आला होता.
शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या बीओंना नोटिसा
हिंगोली : जिल्ह्यातील जि.प. शाळांना दिलेले संगणक कुठे गोदामातच तर कुठे नुसतेच टेबलवर ठेवून धूळखात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आला होता. त्यानंतर त्याची तातडीने दखल घेत शुक्रवारी या विषयावर घेण्यात आलेल्या बैठकीत शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी बीओंना नोटिसा दिल्या. तर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित शाळांचा आठ दिवसांत अहवाल मागविला आहे.
जिल्हा परिषदेत शुक्रवारी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या बैैठकीत स्टिंग आॅपरेशन केलेल्या शाळांचे वाचन करण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेने संगणकासाठी वेळ राखून ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्ह्यातील बीओंना यासंदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. तत्काळ बीओंना पत्र देवून या शाळांचा अहवाल आठ दिवसांत पाठविण्याचे आदेश दिले. मिळालेल्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी सांगितले. तर आवश्यक तेथे सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)