महा ई - सेवा केंद्रांना नोटिसा

By Admin | Updated: July 10, 2016 01:05 IST2016-07-10T00:49:59+5:302016-07-10T01:05:57+5:30

औरंगाबाद : बनावट जात प्रमाणपत्रे देण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील काही महा ई-सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Notices to the Great E-Services Centers | महा ई - सेवा केंद्रांना नोटिसा

महा ई - सेवा केंद्रांना नोटिसा

औरंगाबाद : बनावट जात प्रमाणपत्रे देण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील काही महा ई-सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महा ई- सेवा केंद्रातील संचिकांची तपासणी न करणारे तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
महा ई- सेवा केंद्रांमधून बनावट जात प्रमाणपत्रे देणारे रॅकेट कार्यरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. पाटकर क्षत्रीय या इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गात मोडणाऱ्या जातीच्या महिलेला अनुसूचित जमातीचे (एससी), तर अनुसूचित जमाती (क) प्रवर्गात येणाऱ्या हटकर प्रवर्गातील एका महिलेस बेलदार या अनुसूचित जमाती (ब) प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याचे प्रकार महा ई- सेवा केंद्राकडून केले जात असल्याचे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता कैकाडी, माळी, जंगम, तेली, परीट, कलाल, वंजारी, धनगर, न्हावी, सुतार, शिंपी या जातींची प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया या केंद्रांकडून सुरू होती.
महा ई-सेवा केंद्रांकडून सादर केल्या जाणाऱ्या संचिका तहसील कार्यालय स्तरावर अव्वल कारकून, नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी तपासणे गरजेचे होते; परंतु कसलीही तपासणी न करता अशा अनेक संचिका उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्या आहेत. अर्जदाराने सादर केलेले खोटे पुरावे खरे असल्याचे भासवून बनावट जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे प्रयत्न महा ई- सेवा केंद्रांकडून सुरू होते. याप्रकरणी शहरातील पाच महा ई-सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचे परवाने रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कागदपत्रांची तपासणी न करणाऱ्या नायब तहसीलदारांनाही उपविभागीय अधिकारी कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत.

Web Title: Notices to the Great E-Services Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.