महावितरणच्या ३० शाखा अभियंत्यांना नोटिसा
By Admin | Updated: June 23, 2014 00:21 IST2014-06-22T22:55:17+5:302014-06-23T00:21:07+5:30
परळी : वीज ग्राहकाकडील वीज बाकी समाधानकारक वसूल न झाल्याने वीज वितरण कार्यालयाच्या अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता यांनी ३० शाखा अभियंत्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

महावितरणच्या ३० शाखा अभियंत्यांना नोटिसा
परळी : वीज ग्राहकाकडील वीज बाकी समाधानकारक वसूल न झाल्याने वीज वितरण कार्यालयाच्या अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता यांनी ३० शाखा अभियंत्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. यात त्यांच्या पगारातून एक तृतीयांश रक्कम कपात करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेवरुन परळी शहरात वीज बील न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांनी जून महिन्याची वीज वसुली कमी झाल्याने अंबाजोगाई, परळी, वडवणी, माजलगाव, धारुर येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्यांना त्यांच्या पगारामधून एक तृतीयांश रक्कम कपात करण्यात येणार असल्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना परळीचे कनिष्ठ अभियंता सुहास मिसाळ यांनी दुजोरा दिला आहे. वीज वितरण कंपनीच्या परळी येथील कार्यालयातील लाईनमन, आॅफिस कर्मचारी, अभियंते, वीज वसुलीसाठी घरोघरी ग्राहकाकडे जात आहेत. ग्राहकांनी वीज वसुली देऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)