२१ हजार कर बुडव्यांना नोटिसा

By Admin | Updated: February 11, 2015 00:28 IST2015-02-11T00:14:15+5:302015-02-11T00:28:11+5:30

बीड : कर वसूल करणे हा नगर परिषदेचा मुख्य विभाग असून त्यावरच जवळपास शहरातील विकासाच्या योजना आखल्या जातात. गेल्या वर्षभरात वारंवार

Notices to 21 thousand tax payers | २१ हजार कर बुडव्यांना नोटिसा

२१ हजार कर बुडव्यांना नोटिसा

  बीड : कर वसूल करणे हा नगर परिषदेचा मुख्य विभाग असून त्यावरच जवळपास शहरातील विकासाच्या योजना आखल्या जातात. गेल्या वर्षभरात वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या २१ हजार नागरिकांना नगर परिषदेने नोटिसा पाठविल्या आहेत. विशेष म्हणजे हा आकडा आणखीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता कर वसूल केला जातो. या मालमत्ता करामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, परवाना फी, इमारत भाडे, गाळेभाडे, अग्नीशमन कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर या बाबींचा समावेश असतो. नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांकडे थकीत असलेला कर भरण्यासाठी नागरिकांना सूचना दिल्या जातात. २०१४-१५ या वर्षासाठी व पूवीचा काही थकित कर असा एकूण १८ कोटी ९७ लाख रुपये न.प.ला येणे बाकी होते. त्यापैकी दहा महिन्यात केवळ ४.५ कोटी रुपयांची वसुली करण्यात नगर परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांना यश आले आहे. इतर १२ कोटी २९ लाख रुपये रक्कम कर स्वरूपात अद्यापही थकीत आहे. कर देण्यास नागरीक पुढाकार घेत नसल्यामुळे वसुलीचा आकडा फारसा वाढलेला नाही. यापूर्वी नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे पालन झाले नसल्यामुळे न.प.च्या वसुली विभागाने नोटीस पाठविल्या आहेत. २१ हजार लोकांना नगर परिषदेने नोटिसा काढल्या आहेत. ‘कर थकबाकी भरा, अन्यथा कारवाई करण्यात येईल.’ या आशयाच्या नोटिसा पाठवूनही फारसा फरक पडलेला नाही. अद्याप ६५ टक्के नागरिकांकडे कर थकीत असल्याचे समोर आले आहे. अधिकारी बेजार नगर परिषदेला नागरिकांकडून १२ कोटी ३९ लाख रुपये येणे बाकी आहे. दररोजचे कार्यालयीन काम प्राधान्याने सांगितलेले काम त्यात वसुलीचे काम यामुळे अधिकारी बेजार झाले आहेत. संबंधित विभाग प्रमुखांशी संपर्क साधून ते नागरिकांना कर भरण्यासाठी सूचना देतात. मात्र याचा कोणताही फायदा होत नसल्याचे समोर आले आहे. तीन अधिकाऱ्यांना दिले वसुलीचे काम कर वसुलीचा आकडा फारसा वाढला नसल्यामुळे कर वसुलीसाठी कर अधिकारी नारायण खोमणे व उपकार्यकारी अधिकारी अब्दुल सत्तार व पाटील यांच्याकडे सदरील वसुली करण्याचे काम दिले होते. तिघांनाही प्रत्येकी ६ कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ ४.५ कोटी रुपयेच वसुली झाली आहे. विशेष म्हणजे ही वसुली ३१ जानेवारपर्यंतची आहे. त्यामुळे वसुलीचे काम कासव गतीने सुरु आहे हे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी) बीड शहरातील २१ हजार नागरिकांना कर भरण्या संदर्भात नोटीस दिल्या आहेत. तर ३०० ते ४०० नागरिकांचे जप्तीचे पंचनामे कर विभागाच्या वतीने तयार करण्यात आले आहेत. मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार पुढील जप्तीची कारवाई होणार आहे. आतापर्यंत ६५ टक्के लोकांकडून कर येणे बाकी आहे, असे न.प.चे कर अधिकारी नारायण खोमणे यांनी सांगितले. वारंवार नोटिसा व सूचना देऊनही कर न भरणाऱ्या दांडग्या थकबाकीदारांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. नगर परिषदेने एक हजार लोकांच्या जप्तीचे अधिकारपत्र तयार केले आहे. त्यानुसार आता पुढील कारवाई अपेक्षित आहे. ३०० ते ४०० जणांच्या जप्तीचे पंचनामे तयार केलेले आहेत.

Web Title: Notices to 21 thousand tax payers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.