औंढा नागनाथ तालुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना नोटिसा
By Admin | Updated: June 25, 2014 00:40 IST2014-06-25T00:12:45+5:302014-06-25T00:40:08+5:30
हिंगोली : शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणांचे वितरण केले जात नसल्याच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ तालुुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी कारणे

औंढा नागनाथ तालुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना नोटिसा
हिंगोली : शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणांचे वितरण केले जात नसल्याच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ तालुुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या कृषी अधिकारी तथा गुणवत्ता निरीक्षकांनी तालुक्यातील कृषी केंद्र चालकांची तपासणी केली. शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीवरून केलेल्या या तपासणीत १५ कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेवर व नियमितपणे पुरवठा केले नसल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांना दिला. त्यानंतर नाब्दे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी येथील साई कृषी केंद्र, पोटा खुर्द येथील गणेश कृषी केंद्र, लांडाळा येथील गजानन कृषी केंद्र, शिरड येथील वैभव कृषी केंद्र, कंदी कृषी केंद्र, औंढा येथील सिद्धनाथ कृषी केंद्र, श्री सत्यम ट्रेडर्स, नम्रता कृषी केंद्र, जवळा बाजार येथील बालाजी ट्रेडिंग, रोकडेश्वर कृषी केंद्र, नागेश्वर कृषी केंद्र, अथर्व अॅग्रो एजंसी, अनखळी येथील माऊली कृपा कृषी केंद्र, वडचूना येथील माऊली कृपा कृषी केंद्र आणि तपोवन येथील गणेश कृषी केंद्र यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
त्यामध्ये रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ च्या कलम ३ नुसार, किटकनाशके अधिनियम १९६८ च्या कलम २ नुसार व बियाणे अधिनियम १९६८ नुसार आपला कृषी निविष्ठा विक्री परवाना का निलंबित करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा दोन दिवसांत लेखी स्वरूपात करण्यात यावा अन्यथा दुकानांचा परवाना निलंबित केल्या जाईल, असाही इशारा या नोटिसीद्वारे नाब्दे यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)