जि.प.च्या अधिकारी, कर्मचाºयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:34 IST2017-08-09T00:34:24+5:302017-08-09T00:34:24+5:30

जिल्हा परिषदेत खुर्ची जप्तीच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दर्शक नोटिसा बजावल्या

 Notice to ZP officials, employees | जि.प.च्या अधिकारी, कर्मचाºयांना नोटिसा

जि.प.च्या अधिकारी, कर्मचाºयांना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत खुर्ची जप्तीच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दर्शक नोटिसा बजावल्या, तर कार्यकारी अभियंत्यांनी बांधकाम विभागातील तीन कर्मचाºयांना नोटिसा बजावल्या आहेत.
तथापि, खुर्ची जप्ती प्र्रकरणात जिल्हा परिषदेच्या वतीने न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून, यासंबंधी ११ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने संबंधित कंत्राटदार चोपडा यांना सुनावणीस हजर राहण्याविषयीची नोटीस बजावली आहे.
कंत्राटदार चोपडा यांच्या थकीत बिलासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खुर्ची जप्त करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची जिल्हाभरात मोठी बेअदबी झाली. या घटनेमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सलग दहा ते पंधरा दिवस दालनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल’मध्येच बसणे पसंद केले होते.
कंत्राटदाराच्या थकीत बिल अदाप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याविषयी नोटीस मिळाल्यानंतरही बांधकाम विभागातील कर्मचाºयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. वरिष्ठ अधिकाºयांना त्यासंबंधीची कल्पनादेखील दिली नाही. परिणामी, बांधकाम विभागावर आपले नियंत्रण राहिलेले नाही, या आशयाची नोटीस कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा व कार्यकारी अभियंता आर. आर. पवार यांना बजावली. हे प्रकरण दडपून ठेवल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांनी तीन कर्मचाºयांना कारणे दर्शक नोटिसा बजावल्या, तर ७ कर्मचाºयांना या प्रकरणाविषयी ज्या काही
संचिका असतील त्या तात्काळ सादर करा, या आशयाच्या लेखी सूचना दिल्या.
हे प्रकरण सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामाचे आहे. १९९२ रोजी टी. ए. चोपडा यांना ३५ लाखांचे हे कंत्राट मिळाले होते.

Web Title:  Notice to ZP officials, employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.