सव्वाशे प्राध्यापकांना नोटिसा

By Admin | Updated: December 19, 2014 00:59 IST2014-12-19T00:12:00+5:302014-12-19T00:59:48+5:30

औरंगाबाद : कुचराईपणा करणाऱ्या चार जिल्ह्यांतील प्राध्यापक, सहकेंद्रप्रमुख, भरारी पथकातील सदस्य व भरारी पथकांच्या अध्यक्षांसह १२५ जणांना परीक्षा विभागामार्फत कारणे दर्शक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Notice to Twenty-Five Professors | सव्वाशे प्राध्यापकांना नोटिसा

सव्वाशे प्राध्यापकांना नोटिसा

औरंगाबाद : परीक्षेचे काम आणि उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात कुचराईपणा करणाऱ्या चार जिल्ह्यांतील प्राध्यापक, सहकेंद्रप्रमुख, भरारी पथकातील सदस्य व भरारी पथकांच्या अध्यक्षांसह १२५ जणांना परीक्षा विभागामार्फत कारणे दर्शक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांसाठी विद्यापीठाने सहकेंद्रप्रमुख, भरारी पथके तैनात केली होती. त्यांना परीक्षेचे कामकाज चोखपणे बजावण्यासाठी लेखी आदेशाबरोबर मोबाईलवरून सातत्याने संदेशही पाठविण्यात आले. तरीदेखील अनेक सहकेंद्रप्रमुख तसेच भरारी पथकातील सदस्य व काही अध्यक्षांनी परीक्षेच्या कामाकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे विद्यापीठासह जिल्ह्याच्या ठिकाणी उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेचा निकाल वेळेत लावण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी लेखी तसेच तोंडी आदेश बजावण्यात आले होते. तरीदेखील अनेक प्राध्यापक हे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मूल्यांकन केंद्राकडे फिरकले नसल्याचे परीक्षा विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज गुरुवारी परीक्षा विभागाने संबंधित कामचुकार प्राध्यापकांना विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या ३२(५)(ग) कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवून शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे. संबंधित कामचुकार प्राध्यापकांनी नोटिसेचा खुलासा प्राचार्यांमार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Notice to Twenty-Five Professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.