उदगीरच्या आमदारांसह राज्य शासनाला नोटीस

By Admin | Updated: March 30, 2016 00:46 IST2016-03-30T00:30:24+5:302016-03-30T00:46:57+5:30

लातूर : निकष डावलून लातूर जिल्ह्यातील तोंडार येथील साईधाम मंदिराला पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा देण्याविरोधात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने उदगीर

Notice to the state government, along with Udgir MLAs | उदगीरच्या आमदारांसह राज्य शासनाला नोटीस

उदगीरच्या आमदारांसह राज्य शासनाला नोटीस


लातूर : निकष डावलून लातूर जिल्ह्यातील तोंडार येथील साईधाम मंदिराला पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा देण्याविरोधात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने उदगीर येथील आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह शासनाला नोटीस बजाविण्याचा आदेश न्या. आर.एम. बोर्डे व न्या. पी.आर. बोरा यांच्या खंडपीठाने दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.
माजी आ. चंद्रशेखर भोसले यांनी याविषयी जनहित याचिका दाखल केली आहे. उदगीर तालुक्यातील तोंडार (वनगरवाडी) येथील साईधाम मंदिराला जिल्हा नियोजन व विकास समितीने गेल्या वर्षी ‘क’ वर्ग दर्जा दिला. त्यानंतर आ. भालेराव यांनी शासनाला अनुदानाविषयी पत्र पाठवले. शासनाने सदर पर्यटन स्थळाला ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील ४० लाख रुपये पाठविण्यात आले. प्रक्रिया न राबविता साईधामला ‘क’ वर्गाचा दर्जा देण्यात आल्याचा आरोप करीत याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीअंती शासन, जिल्हा नियोजन व विकास समिती, साईधाम मंदिर प्रतिष्ठान, आ. सुधाकर भालेराव या प्रतिवाद्यांना नोटीस बजाविण्याचा आदेश खंडपीठाने दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. महेश देशमुख यांनी बाजू मांडली. शासनातर्फे सहायक सरकारी वकील व्ही.डी. राख काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Notice to the state government, along with Udgir MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.