सात शाळांना नोटिसा
By Admin | Updated: July 17, 2016 00:33 IST2016-07-17T00:33:02+5:302016-07-17T00:33:53+5:30
औरंगाबाद : मान्यता एका ठिकाणची, शाळा भरते दुसऱ्याच ठिकाणी.

सात शाळांना नोटिसा
औरंगाबाद : मान्यता एका ठिकाणची, शाळा भरते दुसऱ्याच ठिकाणी. खाजगी शाळांचा हा ‘खेळ’ थांबविण्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने पुन्हा सात खाजगी शाळांना मान्यता रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाच्या नोटिसा बजावल्या आहेत.
शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले की, नोटिसा बजावण्यात आलेल्यांपैकी छत्रपती राजे संभाजी विद्यालय, वडगाव कोल्हाटी तसेच सातारा परिसरातील साई ड्रिम्स इंग्रजी या दोन शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. कुंभेफळ येथील शेंद्रा फाईव्ह स्टार, पिसादेवी येथील कॅम्पियन स्कूल, चित्तेपिंपळगाव येथील ज्ञानेश ग्लोबल पिसादेवी येथील शारदामाता शाळा, शेंद्रा कमंगर येथील एन्जल किड्स, न्यू बिगिनिंग इंग्लिश स्कूल, करमाड येथील आदर्श शाळा आदींनी नियमबाह्य स्थलांतर केलेले आहे.