नोटीस बजावणाऱ्यासच अखेर मिळाली नोटीस!
By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-06T23:58:07+5:302014-10-07T00:14:25+5:30
बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून त्यांना कारणे दाखवा नोटिसा देणा-या संबंधित

नोटीस बजावणाऱ्यासच अखेर मिळाली नोटीस!
बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून त्यांना कारणे दाखवा नोटिसा देणा-या संबंधित कक्षप्रमुखास याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
निवडणूक काळात एखाद्या कर्मचाऱ्याला निवडणुकीच्या कामात दिरंगाई केल्याबाबत जर एखादी कारणे दाखवा नोटीस आली तर या कर्मचाऱ्याला घामच फुटतो. पण बदनापूर विधानसभा मतदारसंघात गैरहजर नसतानाही कारणे दाखवा नोटिसा दिल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
बदनापूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकरीता नुकतेच पहिले प्रशिक्षण संपन्न झाले त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी असे एकूण १७२७ पैकी १५७४ हजर व १५३ कर्मचारी गैरहजर दाखविण्यात आले होते. त्यामुळे एवढ्या मोठया प्रमाणात असलेल्या गैरहजेरीची मोठी चर्चा झाली होती .
मात्र या प्रशिक्षणात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी घेण्याकरीता ठेवलेल्या वेगवेगळ्या टेबलांवर ठेवण्यात आलेल्या हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तसेच काही कर्मचारी अन्य मतदारसंघात निवडणूक कामांकरिता नियुक्त होते. तर काही या मतदारसंघातच असलेल्या कामांकरिता नियुक्त केलेले होते अशाप्रकारे १५३ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ३० ते ४० कर्मचारीच गैरहजर होते. त्यामुळे गैरहजर दाखविलेले कर्मचारी निवडणुकीचे काम करीत असतानाही त्यांना गैरहजर दाखविण्यात आले अशा हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने या प्रशिक्षणात हजर नसल्याबाबत कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या, मात्र या कर्मचाऱ्यांनी आपण निवडणुकीच्या कामातच असल्याचे संबंधितांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे त्यांची यातून सुटका झाली मात्र संबंधितांनी कार्यतत्परता दाखवत दिलेल्या माहितीमुळे या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम करूनही मानसिक मनस्ताप सहन करावा लागला. (वार्ताहर)