शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांना नोटीस

By Admin | Updated: November 12, 2016 01:01 IST2016-11-12T01:01:14+5:302016-11-12T01:01:32+5:30

बीड : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांनी शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांच्यासह पाच जणांना शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Notice to five people, including education officials | शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांना नोटीस

शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांना नोटीस

बीड : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांनी शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांच्यासह पाच जणांना शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सहायक प्रशासन अधिकारी जे.एच. राजपूत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.डी. जाधव, वरिष्ठ सहायक व्ही.डी. जावळे, कनिष्ठ सहायक डी.के. सुके यांचा नोटीस बजावलेल्यांमध्ये समावेश आहे.
निलंबित शिक्षक जालिंदर सोनवणे यांच्या विभागीय चौकशीची संचिका दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवली. शाम गुंजाटे, बालाजी मेहेत्रे, सुरेश हिरेवाड, नाना गाडे, नरसिंग होरमाळे, हनुमंत अडागळे, बाबासाहेब चव्हाण, दत्ता कसबे या निलंबित शिक्षकांच्या विभागीय कारवाईस विलंब करणे, २१ अनधिकृत शिक्षकांविरुद्ध कारवाईस टाळाटाळ करणे, विभागीय चौकशीच्या कामात हलगर्जीपणा करणे आदी कारणांचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
राज्य जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ व १९६४ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. तीन दिवसांत खुलासा सादर करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबी ननावरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Notice to five people, including education officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.