्रपूररेषेतील १ हजार कुटुंबांना नोटिसा

By Admin | Updated: June 7, 2014 00:25 IST2014-06-06T23:31:08+5:302014-06-07T00:25:30+5:30

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत येणाऱ्या शहरातील १ हजार मालमत्ताधारकांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली

Notice to 1,000 families in UP | ्रपूररेषेतील १ हजार कुटुंबांना नोटिसा

्रपूररेषेतील १ हजार कुटुंबांना नोटिसा

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत येणाऱ्या शहरातील १ हजार मालमत्ताधारकांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली असून मोडकळीस आलेल्या इमारतीची दुरूस्ती करून मजबूत बांधकाम करण्याची किंवा पाडण्याची सूचना देण्यात आली आहे़
शहरातील लोकवस्ती असलेला बराचसा भाग गोदावरी नदीकाठावर वसला आहे़ अतिवृष्टीनंतर शहरातील काही सखल भागात अधिक पाणी साचून कुटुंबाची जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पूर पातळीत ज्या कुटुंबाचे वास्तव्य आहे़ त्यांना पूर परिस्थितीच्या कालावधीत नुकसानीचा धोका संभवतो़ अशा संबंधित मालमत्ता धारकांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६३ चे उल्लंघन करून नियमितच्या पूरग्रस्त भागात अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ त्यानुसार संबंधित कुटुंबांना सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून इतर सुरक्षित जागेवर स्थलांतरण करण्याच्या नोटिसा मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत बजावण्यात आल्या आहेत़ पावसाळ्यातील स्थिती लक्षात घेऊन मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याची शक्यता अधिक असते़ त्यानुसार मालमत्ताधारकांना इमारत निरीक्षकांच्या अहवालावरून इमारत पाडण्याचे आवाहन केले आहे़
वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ४४५ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त एस़ टी़ मोरे यांनी दिली़ पूररेषेतील गोवर्धनघाट टेकडी, नालागुट्टाचाळ, खडकपुरा, शनिमहाराज मंदिर नाल्याजवळील कुटुंबांना नोटीस देवून घरे रिकामे करण्याविषयी कळविले आहे़ संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी १२ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत़ तसेच २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे मोरे यांनी सांगितले़
क्षेत्रीय क्रं ३ इतवारा भागातील साडेतीनशे कुटुंबांना नोटिसा बजावल्याचे सहायक आयुक्त सुधीर इंगोले यांनी सांगितले़ तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बेग यांनी पावसाळापूर्व कामे जलदगतीने सुरू असून मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे़ या मोहिमेसाठी घनकचरा व्यवस्थानाच्या ठेकेदाराचे ५० आणि महापालिकेत नियमित सफाई करणारे २० मजूर याप्रमाणे ७० जणांचे मनुष्यबळ, तसेच २ पोकलेन, २ जेसीबी व २ नाला कटर मशीन व नालेसफाईचे इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Notice to 1,000 families in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.