शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

थंडी-वाऱ्यानेच नव्हे, तर उष्णतेनेही होते सर्दी! लक्षणांकडे दुर्लक्ष नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 19:42 IST

उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय ?

छत्रपती संभाजीनगर : पावसामुळे किंवा थंडी-वाऱ्यामुळे अनेकांना सर्दी होते. काहींना पाण्यात बदल झाला तरी सर्दी होते; तथापि, सर्दीचा आणखी एक प्रकार म्हणजे उष्णतेने होणारी सर्दी. अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सर्दी कशामुळे होऊ शकते?पावसात भिजल्यास : पावसात भिजल्यावर केस आणि अंग कोरडे केले आणि भिजलेले कपडे लगेच बदलले पाहिजे. नाहीतर सर्दी होऊ शकते.व्हायरल इन्फेक्शन : व्हायरल इन्फेक्शनमुळेही सर्दी, खोकल्याला सामोरे जावे लागते.उष्णता : उष्णताही सर्दी आणि फ्लूचे कारण विषाणू (व्हायरस) आहे. जसजसे हवामान गरम होते तसतसे काही विषाणू सक्रिय होतात जे आजारी बनवितात.एसीचा वापर : बाहेरून घरी, कार्यालयात येताच अनेकजण एसी लावतात. या सवयीनेही सर्दी होण्यास हातभार लागतो.पित्त वाढल्यास होते सर्दी : पित्त वाढल्यानंतरही अनेकांना सर्दीचा त्रास उद्भवतो.

उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय ?बाहेरून घरी, कार्यालयात येताच एसी किंवा कुलर सुरू करणे, तर एसी रूममधून बाहेर पडून उन्हात जाणे, घरात येताच अंघोळ करणे, या गोष्टी टाळाव्या. भरपूर पाणी आणि इतर द्रव प्यावे. दररोज कमीत कमी ८ -१० ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा आणि अल्कोहोल आणि कॅफिन टाळा, ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. दररोज कमीतकमी सात-आठ तास झोपावे.

लक्षणांकडे दुर्लक्ष नकोसध्या ताप, पोटदुखी, गळादुखी, डेंग्यूसदृश रुग्ण वाढले आहेत. मूल जर गळाले असेल, झोपून राहात असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. बाहेरचे पाणी, अन्नपदार्थ टाळावे.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद