अनेक विषयाचा अभ्यासक्रमच नाही
By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-01T23:55:25+5:302014-07-02T00:30:29+5:30
शंकरनगर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाचे १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे़ पण अद्यापही काही वर्गाच्या विषयांचा अभ्यासक्रम नेटवर टाकण्यात आला नाही़

अनेक विषयाचा अभ्यासक्रमच नाही
शंकरनगर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाचे १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे़ पण अद्यापही काही वर्गाच्या विषयांचा अभ्यासक्रम नेटवर टाकण्यात आला नाही़
गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे अनेकानेक प्रयोग सुरू आहेत़ पूर्वी १०० गुणांचा पॅटर्न होता़ तो बदलून ८० लेखी व २० प्रात्यक्षिक असा करण्यात आला़ त्यानंतर सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात आली़ यात ४० लेखी, १० प्रात्यक्षिक असे गुण ठरविण्यात आले होते़ हा सेमिस्टर पॅटर्न सुरळीतपणे सुरू असताना अचानक राज्य लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बहुपर्यायी प्रश्नोत्तर पद्धती सुरू करण्यात आली़ हा पॅटर्नही आता अमान्य होवू लागला असून ३०+१०+१० चा नवीन पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा आहे़
विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले आहे़ जुलै महिना उजाडला़ महाविद्यालयांनी अध्यापकांना तासिका घेण्याचे आदेश दिले़ परंतु द्वितीय वर्षाच्या काही विषयांचा अभ्यासक्रम अद्याप नेटवर आला नाही़ पुस्तके तर दूरच, त्यामुळे शैक्षणिक कार्य खोळंबले आहे़ स्वत: कुलगुरूंनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)
दर पाच वर्षांनी सर्व शाखांचा अभ्यासक्रम बदलला जातो़ गतवर्षी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम बदलला आहे़ नैसर्गिक वाढीप्रमाणे यावर्षी सर्व शाखांचा द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलत आहे़ अभ्यास मंडळ पदाधिकाऱ्यांनी नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच नेटवर टाकणे आवश्यक आहे़ जेणेकरून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेवर उपलब्ध होवून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होईल़