शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सगळे संपते असे नाही;वेळीच निदान, उपचाराने कॅन्सर होतो पूर्ण बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 18:49 IST

जागतिक कर्करोग दिन: वृद्धच नवे, तर खेळण्या- बागडण्याच्या वयातही गाठतोय कॅन्सर

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : आम्ही तर कधी गुटखा, तंबाखू खाल्ली नाही, मग आम्हाला का कॅन्सर झाला, असा प्रश्न काही चिमुकल्यांकडून कुटुंबीयांना विचारला जातो, तर कधी डाॅक्टरांना. वृद्धच नवे, तर खेळण्या - बागडण्याच्या वयातही काहींना कॅन्सर होत आहे. अगदी तीन महिन्यांचे चिमुकलेही शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल होतात. मात्र, कॅन्सर झाला म्हणे सगळे संपले नाही, वेळीच निदानाने कॅन्सर बरा होतो, असे तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळण्यात येतो. ‘क्लोज द केअर गॅप’ ही २०२२ ते २०२४ ची संकल्पना आहे. प्रत्येकालाच कॅन्सरच्या निदानापासून ते उपचाराची आरोग्यसेवा, सुविधांची माहिती असायला हवी, याने अकाली मृत्यू थांबविणे शक्य आहे. औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालय आता संपूर्ण राज्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरतेय. रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे.

सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेसाठी प्रयत्नविविध प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. विस्तारीकरणामुळे सोयी-सुविधांत वाढ होईल.- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

काय म्हणतात तज्ज्ञ....? 

जनरल प्रॅक्टिशनरची जबाबदारी महत्त्वाची३० वर्षांवरील महिलांनी दरवर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तपासणी केल्यास गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान प्रारंभिक स्थितीत होऊ शकते. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनरनाही कॅन्सरबद्दल माहिती असावी. जेणेकरून ते वेळेवर रुग्णांना मार्गदर्शन करू शकतील. कारण ग्रामीण भागात रुग्ण सर्वप्रथम त्यांच्याकडेच जातात.- डाॅ. अर्चना राठोड, सहयोगी प्राध्यापक, स्त्री कर्करोग विभाग

कॅन्सरमध्ये ४ टक्क्यांनी वाढगेल्या २० वर्षांत कॅन्सर ४ टक्क्यांनी वाढला. ३० टक्के रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, ही बाब चिंताजनक आहे. २०१० मध्ये वर्षभरात २५० शस्त्रक्रिया होत. आता १२०० ते १५०० शस्त्रक्रिया होतात. तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.- डाॅ. अजय बोराळकर, सहयोगी प्राध्यापक, कर्करोग शल्यचिकित्सा विभाग

आधुनिक उपचारतरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी व्यसन प्रमुख कारण आहे. शेतात रासायनिक खतांचा होणारा वापरही कारणीभूत ठरत आहे. परंतु, कॅन्सरवर आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.- डाॅ. बालाजी शेवाळकर, किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख

पूर्वी बालरुग्ण दुर्मीळ, आता वाढबालकांमध्ये कॅन्सर आढळणे, हे पूर्वी दुर्मीळ होते. परंतु, आता हे प्रमाण वाढत आहे. बालकांत रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. त्याबरोबर हाडाचे, किडनी, लिव्हरचे कर्करोग मुलांमध्ये आढळतात. वेळीच निदान झाले तर त्यावर मात करता येते.- डाॅ. आदिती लिंगायत, बालकर्करोग विभागप्रमुख

गेल्या वर्षभरातील कर्करोग रुग्णांची स्थिती (शासकीय कर्करोग रुग्णालय)-बाह्यरुग्ण विभाग- ६२५९- आंतररुग्ण विभाग- ३९४८- मोठ्या शस्त्रक्रिया- ८४२- छोट्या शस्त्रक्रिया- ८४९- डे केअर- १२,७८५- आयसीयू- ६०७- मृत्यू- १८०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcancerकर्करोगdoctorडॉक्टर