शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पीक विमा नव्हे, ही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कंपन्या कल्याण योजना - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : पीक विम्यापोटी ८०४१ कोटी रुपये विमा कंपन्यांना भरण्यात आले. प्रत्यक्षात ७०० कोटी रुपयांचे विम्याचे ...

ठळक मुद्देआत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी शेतकरी सन्मान अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पीक विम्यापोटी ८०४१ कोटी रुपये विमा कंपन्यांना भरण्यात आले. प्रत्यक्षात ७०० कोटी रुपयांचे विम्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. या विम्याचा फायदा शेतकºयांपेक्षा कॉर्पोरेट कंपन्यांना अधिक झाला. ही प्रधानमंत्री पीक विमा योजना नसून ती ‘प्रधानमंत्री कॉर्पोरेट कंपन्या कल्याण योजना’ झाली असल्याची खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी येथे केली.संघटनेच्या वतीने १ मेपासून ‘शेतकरी सन्मान अभियान’ राबविले जात आहे. ‘आता मरणार नाही...तर लढणार’ असा नारा देत शेतकºयांमध्ये जीवनाविषयी सकारात्मक भावना याद्वारे निर्माण करण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने खा. शेट्टी शुक्रवारी शहरात आले होते. पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, मागील वर्षी ४२ हजार कोटी रुपयांचे शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले होते. यंदा मात्र २२ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. याचा अर्थ शेतकरी सधन झाले असे नाही, तर बँका शेतकºयांना कर्ज देणे टाळत आहेत. यामुळे शेतकºयांनी सावकार, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. ते फेडता येत नसल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने अदानीला आफ्रिकेतून डाळी आयातीची परवानगी दिली. यामुळे देशात डाळीचे भाव घटले, हे सुद्धा आत्महत्या वाढण्याचे कारण असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. एकीकडे एकानंतर एक येणारी नैसर्गिक आपत्ती व दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारचे कृषीविषयक सुलतानी धोरण हेच आत्महत्या वाढीस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात, हे आमचे अपयश आहे, अशी खंत खा. शेट्टी यांनी व्यक्त केली. यासाठी ९ मे पर्यंत ‘ शेतकरी सन्मान अभियान’ राबवीत असून, यात शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात येत आहे. यासाठी शेतकºयांकडून फॉर्मही भरून घेण्यात येत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीचे व्ही.एम. सिंग, जय किसान आंदोलनाचे अविक शहा यांची उपस्थिती होती.नोटाबंदी, जीएसटीचा सर्वाधिक फटका शेतकºयांनाखा. राजू शेट्टी म्हणाले की, शेतकºयांचे सर्व व्यवहार रोखीने होतात. यामुळे नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला, तसेच इतर कंपन्यांनी लॉबिंग करून जीएसटीतील करप्रणालीत बदल करून घेतले.आपली उत्पादने त्यांनी कमी करप्रणालीत टाकली; पण शेतकºयांना अशी लॉबिंग करता आली नाही.कृषी क्षेत्रात लागणारी सर्व यंत्रे, साहित्य, खत, बियाणे यावरील जीएसटीत जास्त कर लावण्यात आल्याने त्याचा फटकाही शेतकºयांना बसल्याचा आरोपही त्यांनी केला.विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीअखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीचे व्ही.एम. सिंग म्हणाले, शेतकºयांच्या प्रश्नासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना व ३२ राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.१० मे रोजी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत निवेदन देण्यात येणार आहे. याद्वारे केंद्र सरकारला विशेष अधिवेशन घेण्यास आम्ही भाग पाडू.या अधिवेशनात दोन विधेयक मांडण्यात येतील, यात १) शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी २) स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, याचा समावेश असणार आहे.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाAurangabadऔरंगाबादRaju Shettyराजू शेट्टी