उत्तर भारतातील धुक्याने सचखंड रेल्वेसेवेत खंड
By Admin | Updated: December 26, 2014 00:15 IST2014-12-26T00:08:23+5:302014-12-26T00:15:51+5:30
औरंगाबाद : धुक्यामुळे परतीची रेल्वे उशिरा धावत असल्याने याचा परिणाम अमृतसरला जाणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर झाल्याचे दिसून आले. २५ डिसेंबरची परतीची रेल्वे २४ तास उशिराने धावली.

उत्तर भारतातील धुक्याने सचखंड रेल्वेसेवेत खंड
औरंगाबाद : धुक्यामुळे परतीची रेल्वे उशिरा धावत असल्याने याचा परिणाम अमृतसरला जाणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर झाल्याचे दिसून आले. २५ डिसेंबरची परतीची रेल्वे २४ तास उशिराने धावली. यामुळे २६ डिसेंबरची हुजूर साहिब नांदेड- अमृतसर एक्स्प्रेस (१२७१५) रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. उत्तर भारतातील थंडीचा जोर कमी होईपर्यंत ही रेल्वे उशिरानेच धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विमानेही उशिरा
गेल्या काही दिवसांतील धुक्याच्या वातावरणामुळे दिल्ली विमानतळावर विमानांच्या उड्डाणास तीन तासांपेक्षा अधिक विलंब झाला. याचा परिणाम गेले दोन ते तीन दिवस काही प्रमाणात औरंगाबादला येणाऱ्या विमानांच्या वेळेवरही झाला. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला.