मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी पुरवठा करण्यात गैर काय- मुंडे
By Admin | Updated: April 16, 2016 23:29 IST2016-04-16T23:28:36+5:302016-04-16T23:29:51+5:30
बीड: मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात यावा,

मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी पुरवठा करण्यात गैर काय- मुंडे
बीड: मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी होत असतानाच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी कंपन्यांना पाणी पुरवठा करण्यात गैर काय, असा सवाल उपस्थित केला आहे. दुष्काळी आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्योगधंद्यांसाठीचे आरक्षित पाणी त्यांना देण्यात चुकीचे काहीही नाही, अशी भूमिका मांडली.
औरंगाबाद येथील मद्यनिर्मित कंपन्यांना पाणी पुरवठा होत असल्याने वर्षाकाठी कोट्यावधी लीटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत हा पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद अशा मराठवाड्यात सहा मद्यनिर्मित कंपन्या आहेत. यांचा पाणीपुरवठा बंद केला तर उद्योगांपेक्षा येथील कामगारांचे आणि सरकारचे अधिक नुकसान होईल. या उद्योगांमुळेच सरकारला महसूल आणि नागरिकांना रोजगार मिळतो. मद्यनिर्मिती करणारी कंपनी असली तरी त्यातून अनेकांचे पोट भरते. या कंपन्या बंद झाल्या तर अनेकांवर उपासमारीची वेळ येईल, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.