शौचालय योजनेत मनपा नापास!
By Admin | Updated: May 9, 2016 00:06 IST2016-05-08T23:57:09+5:302016-05-09T00:06:09+5:30
औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले.

शौचालय योजनेत मनपा नापास!
औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शहरी भागात घर तिथे शौचालय उपक्रम हाती घेण्यात आला. औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने २ कोटी ६७ लाख ६२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शासनाच्या या उपक्रमाला छेद देण्याचा प्रयत्न मनपाने केला. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत मनपा अधिकाऱ्यांची बरीच कानउघाडणी करण्यात आली.
२०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहरात ११ हजार ९९७ नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. मनपाने खाजगी प्रकल्प सल्लागार संस्था नेमून सर्वेक्षणही करून घेतले. सर्वेक्षणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने एका दिवसात मनपाला सर्वेक्षण पूर्ण केल्याचा खळबळजनक अहवालही दिला. या अहवालावरून प्रशासनाने फक्त १५३ लाभार्थ्यांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला. त्यातील ४० ते ५० लाभार्थ्यांनीच शौचालये बांधली. महापालिकेने या योजनेत ज्या पद्धतीने काम करायला हवे त्या पद्धतीने केले नाही. या योजनेचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घेण्यात आला. मनपाच्या या भोंगळ कारभारावर राज्य शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली.