आजपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:48 IST2017-09-16T00:48:30+5:302017-09-16T00:48:30+5:30
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. यावेळेस उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व इतर कागदपत्रे दाखल करण्यासाठी सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र हे आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचे यापूर्वीच निर्देश दिले आहेत.

आजपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. यावेळेस उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व इतर कागदपत्रे दाखल करण्यासाठी सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र हे आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचे यापूर्वीच निर्देश दिले आहेत.
आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरताना शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर स्वत:ची नोंदणी करुन उपलब्ध करुन घ्यावी व नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रात माहिती भरावी. या माहितीची प्रिंटआऊट काढून हार्ड कॉपी व त्यावर स्वाक्षरी करुन ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत दाखल करावे. अशाप्रकारे भरलेले व स्वाक्षरी केलेले नामनिर्देशनपत्रच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मालमत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत शपथपत्र हे आॅनलाईनमार्फतच भरणे आवश्यक आहे.
नामनिर्देशनपत्र सादर करताना अनामत रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात रोखीने भरुन त्याची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराला अराखीव प्रभागासाठी ५ हजार रुपये, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती राखीव प्रभागासाठी २५००, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २५००, महिलांसाठी २५०० रुपये अनामत रक्कम आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविणाºया उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास उमेदवाराची जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केलेल्या अर्जाच्या पोचपावतीची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
नामनिर्देशनसोबतचे दाखल करावयाचे शपथपत्र हे स्टॅम्प पेपरवर देण्याची आवश्यकता नाही. साध्या कागदावर तयार करुन सक्षम अधिकाºयाकडे नोटरी करुन ते सादर करता येईल. तसेच अर्ज दाखल केलेल्या दिनांकापासून खर्चाचा तपशील दररोज दाखल करणे आवश्यक आहे.
निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. उमेदवार पक्षातर्फे निवडणूक लढवित असल्यास त्या पक्षाचे अध्यक्ष, सचिव किंवा अन्य पदाधिकाºयांनी दिलेले जोडपत्र-२ व जोडपत्र-१. विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारी मागे घेताना अर्ज आॅनलाईन देता येणार नाही.