नमस्कारामुळे आत्मविश्वास वाढतो
By Admin | Updated: June 22, 2014 00:42 IST2014-06-22T00:38:27+5:302014-06-22T00:42:03+5:30
पळसा : जिल्हा परिषद आपल्या दारी या संकल्पनेतून जि़प़नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे हे दररोज एका खेड्यामध्ये स्वत: मुक्काम करून जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून घेत आहेत़

नमस्कारामुळे आत्मविश्वास वाढतो
पळसा : जिल्हा परिषद आपल्या दारी या संकल्पनेतून जि़प़नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे हे दररोज एका खेड्यामध्ये स्वत: मुक्काम करून जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून घेत आहेत़ याच कार्यक्रमांतर्गत पळसा ता़ हदगाव येथे हनुमान मंदिरासमोर ग्रामसभा घेवून शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली़
लक्षवेधी नमस्काराबद्दल बोलताना त्यांनी प्राथमिक शिक्षणापासून मुलांनी आई-वडील, गुरू यांना नमस्कार करावा व सर्व लहान-थोरांना शाळेत जाताना-येताना तसेच ओळखीच्या व अनोळखी व्यक्तींना सुद्धा नमस्कार करण्याचे आवाहन केले व त्याचबरोबर मोठ्या माणसांनी सुद्धा सर्वांना नमस्कार करावा असे आवाहन केले़ नमस्कारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व पुढे ते कोणासोबत बोलताना संकोच करणार नाहीत व तसेच नितीमुल्यांचे जतन होईल़ संस्कृती टिकेल असे त्यांनी सांगितले़
कार्यक्रमास निर्मल भारत, सुवर्ण जयंती, शौचालय इत्यादी विषयी सखोल माहिती गटविकास अधिकारी निलेश घुले यांनी दिली़ तसेच संपूर्ण गाव निर्मल केल्यास गावास २५ लाख रुपये शौचालयासाठी उपलब्ध करून देऊ असे कार्यकारी अभियंता एस़पी़ पैलवाड यांनी सांगितले़
कार्यक्रमास सरपंच कांताबाई मुळे, तालुका आरोग्य अधिकारी पालिकोंडावार, उपअभियंता मुदीराज, शिक्षण विस्तार अधिकारी बाच्चे, गायकवाड, बागल, उपसरपंच उत्तमराव कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलिकराव मस्के, सुनील पाटील, विलास मस्के, नरहरी घिरटकर, दत्तराव सुरोशे, भगवान कोथळकर, शिवाजीराव मस्के, गोपाल भाऊ, कोंडबा दवणे, अंगणवाउी कार्यकर्ती, मदतनीस, ग्रामसेवक पांडुरंग श्रीरामवार, शंकर मुळे, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)