नाममात्र पीकविमा मंजूर

By Admin | Updated: August 31, 2014 01:08 IST2014-08-31T00:40:20+5:302014-08-31T01:08:22+5:30

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी महसूल मंडळात खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये भरलेला पीक विम्यामध्ये फक्त सोयाबीनचा विमा नाममात्र मंजूर झाला.

Nominal pavement approved | नाममात्र पीकविमा मंजूर

नाममात्र पीकविमा मंजूर


तळणी : मंठा तालुक्यातील तळणी महसूल मंडळात खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये भरलेला पीक विम्यामध्ये फक्त सोयाबीनचा विमा नाममात्र मंजूर झाला.अन्य पिकांचा विमा नामंजूर झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मागील वर्षी आधी दुष्क ाळ, नंतर अतिवृष्टी व अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. २३ जुलैला झालेला अतिवृष्टीमध्ये जमिनीसह पिके खरडून गेली. अनेक शेतक ऱ्यांचा शेतात पाणी साचल्याने पिके सडली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडिद, तूर , बाजरी, ज्वारी या पिकांचा विमा भरला होता. मात्र, फक्त सोयाबीनचा विमा नाममात्र मंजूर झाला. तळणी महसूल मंडळातील १ हजार ६११ सभासदांना १० लाख ३४ हजार रुपये पीक विमा मूंजर झाला आह. अन्य पिकांचा विमा नामंजूर झाल्यामुळे शेतक ऱ्यांचे मोठे नुक सान झाले असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब खंदारे यांनी सांगितले. तळणी महसूल मंडळात चिखली, मोहदरी, पेवा, खोरवड,अंभोर शेळके ,आदवाडी, उस्वद , देवठाणा, जांभरूण, हनवतखेडा, लिंबखेडा, सासखेडा, कि र्ला, दुधा, तुपा ,वाघाळा, पोखरी, भुवन, वझर सरक टे, क ोकं रबा, इंचा, टाक ळखोपा, शिरपूर, कानडी, वडगाव सरहद या गावाचा समावेश आहे.
इतर पिकांनाही विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.यंदा उशिराने पावसास सुरुवात झाल्याने पिकांची परिस्थिती नाजूक आहे. (वार्ताहर)

Web Title: Nominal pavement approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.