शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

ना पाणी, ना लाईट, ना टॉयलेट; कष्टकऱ्यांच्या विठ्ठलनगरातील अंगणवाडी वाऱ्यावर

By दत्ता लवांडे | Published: January 30, 2024 3:28 PM

'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो'; 'सरपंचपती'चे अजब विधान

- दत्ता लवांडेपैठण : गावालगत असलेले उसाचे शेत, शेजारीच असलेले ज्वारीचे शेत, तिथेच गावाला वीजपुरवठा करणारी विजेची डीपी, जनावरांना खाण्यासाठी लागणाऱ्या वैरणीच्या गंजी, उसाच्या शेतातील पाचटाचा ढिगारा, छातीएवढे वाढलेले गवत आणि यामध्ये मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा पाया असलेली अंगणवाडी. या अंगणवाडीत ना लाईट, ना पाणी, ना टॉयलेट अशी अवस्था. पैठण तालुक्यातील टाकळी अंबड गावातील विठ्ठलनगर येथे असलेल्या अंगणवाडीची ही अवस्था आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपासून सुरू झालेल्या अंगणावाडीसाठी ग्रामपंचायतीकडून कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. 

दरम्यान, टाकळी अंबड गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलगर येथील बहुतांश नागरिक हे उसतोड मजूर म्हणून काम करतात. या गावात सहा ते सात वर्षांपूर्वी बांधलेल्या अंगणवाडीमध्ये एका महिन्यापूर्वी केवळ एक कपाट, टेबल अन् खुर्च्या देण्यात आल्या आहेत.

लाईट-पाण्याची सुविधा नाहीअंगणवाडी सुरू होऊन काही वर्षे उलटून गेले तरी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि लाईटची सुविधा नाही. त्याचबरोबर रूममध्ये असेलेले टॉयलेट, बाथरूम आणि किचनचीही दुरावस्था झाली आहे. या अंगणवाडीतील लहान मुलांना खेळायला कोणत्याच प्रकारचे ग्राऊंड नसल्याने मुलांचा शारीरिक विकासही खुंटत आहे. 

शेजारीच डीपी अन् उसाचे शेतअंगणवाडीच्या शेजारीच गावाला वीजपुरवठा करणारी डीपी आहे. या डीपीला किंवा अंगवणाडीला कसल्याही प्रकारचे कुंपन घातले नाही. त्याचबरोबर शेजारीच उसाचे शेत असल्यामुळे जंगली प्राणी किंवा साप, विंचू अशा प्राण्यांचा धोका लहान मुलांना आहे. उसाचे पीक मोठे झाल्यानंतर बिबट्यासारख्या प्राण्यांचा यामध्ये वावर आढळतो. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

छत गळके, भिंतीला पडल्या भेगाया अंगणवाडीच्या इमारतीचे छत पावसाळ्यामध्ये मागच्या दोन वर्षांपासून गळत आहे. यामुळे लहान मुलांना रूममध्ये नाहीतर पडवीत बसावे लागते. भिंतीलासुद्धा पाठीमागे आणि पुढे अशा चार पाच जागेवर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे साप, विंचू किंवा सरपटणारे प्राणी रूममध्ये येण्याचा धोका आहे. पडवीमध्ये असलेली फरशीसुद्धा निघाली असून पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे.  

अंगणवाडी आवारात कचरा, गवतांचा उतअंगणवाडीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जो परिसर आहे त्या परिसरात उसाचे पाचट, जनावरांची वैरण, कचरा टाकलेला आहे. अंगणवाडीच्या भिंतीलगत छातीएवढे गवत वाढले असल्याने विद्यार्थ्यांना मोकळी जागा उपलब्ध नाही. अशा अवस्थेत उसतोड कामगारांचे मुलं शिक्षण कसे घेतील हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

अंगणवाडीत अजूनही नाही फळामुलांना शिकवण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे फळा आणि खडू. पण या अंगणावाडीत अजूनही फळा नाही अशी अवस्था आहे. अंगणवाडी सेविका वेळेवर हजर राहत नाही, तर आल्यानंतर लवकरच घरी जातात. पोषण आहारसुद्धा व्यवस्थित आणि वेळेवर येत नाही, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. 

'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो'याप्रश्नी टाकळी अंबड येथील सरपंच जयश्री घायतडक यांचे पती सुनिल घायतडक यांना संपर्क केला असता, 'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो, दुरवस्था का झाली तुम्हाला माहिती नाही का?' असं अजब उत्तर मिळालं. त्याचबरोबर, 'सरपंच इथे नाहीत, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही' असं सांगत त्यांनी अंगणवाडीच्या सुविधेच्या प्रश्नावर उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.

अंगणवाडीच्या आवारात जनावरे बांधतात "आम्ही मागच्या एक दीड वर्षांपासून अंगणवाडीमध्ये लाईट, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज केला आहे पण या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. त्याचबरोबर रूमच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत, छत गळत आहे,  अंगणवाडीच्या आवारात स्थानिक नागरिक जनावरे बांधतात यामुळे लहान मुलांना खेळायला ग्राऊंडच उपलब्ध नाही." - शशिकला म्हस्के (अंगणवाडी सेविका, विठ्ठलनगर)

शैक्षणिक, शारिरीक नुकसान"अंगणवाडी सेविका अनेकदा वेळेवर हजर नसते. तर अंगणावाडीमध्ये फळा घेण्यासाठी सेविकेने लहान मुलांच्या पालकांकडून प्रत्येकी ५० रूपये जमा केले आहेत पण अजूनही तेथे फळा नाही. लहान मुलांना पोषण आहारही व्यवस्थित दिला जात नाही. त्यामुळे येथील लहान मुलांचे शैक्षणिक आणि शारिरीक नुकसान होत आहे."- दिलीप भोसले (स्थानिक नागरिक, विठ्ठलनगर)

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत