शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

पुरातत्वीय संकेत पाळणे आवश्यक, विकासाच्या नावाखाली किल्ल्यांवर ‘रोप-वे’ नको

By संतोष हिरेमठ | Updated: June 24, 2023 19:44 IST

गड संवर्धन समितीची बैठक; मराठवाड्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचा करावा सर्वांगीण विकास

छत्रपती संभाजीनगर : किल्ल्यांचा विकास करताना पुरातत्वीय संकेत पाळणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली गरज नसताना रोप-वे किंवा आधुनिक यंत्रणा किल्ल्यांच्या ठिकाणी उभारणे, हे ऐतिहासिक व तत्त्वत: अयोग्य आहे. लोकांना किल्ल्यांचा इतिहास समजण्यासाठी लाईट आणि साउंड शो या पलीकडेही इतर प्रभावी उपाययोजना करता येऊ शकतात, त्या दृष्टीनेही प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा मंगळवारी गड संवर्धन समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

गड संवर्धन समिती आणि राज्याच्या सांस्कृतिक धोरण निश्चितीसाठी स्थापन उपसमितीची संयुक्त बैठक मंगळवारी झाली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधीक्षक डॉ. शिवकुमार भगत, सहायक संचालक, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण अंतर्गत स्थापन उपसमितीचे अध्यक्ष बाबा नंदन पवार, सदस्य संदीप तापकीर, प्राची पालकर, गड संवर्धन समितीचे सदस्य संकेत कुलकर्णी, तेजस्विनी आफळे, प्रमोद बोराडे, राजेश नेलगे, शैलेश वरखडे, सतीश अक्कलकोट आदी उपस्थित होते.

सदस्यांनी केलेल्या सूचनागड संवर्धन समितीतील सदस्यांनी गडकिल्ल्यांसंदर्भातील समस्या, त्यावर आवश्यक उपाययोजना, किल्ल्यांच्या विकासासाठी आवश्यक आराखडा इ.वर चर्चा झाली. किल्ल्यांचे महत्त्व लोकांमध्ये बिंबवणे, स्थानिक रोजगार, पर्यटनाच्या संधी, किल्ल्याभोवतीच्या पर्यावरणाचा विकास, किल्ल्याच्या ठिकाणी शौचालय, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक यांची सोय करणे, गड-किल्ल्यांच्या शासनाद्वारे अधिकृत माहितीपुस्तिका तयार करणे, किल्ल्यांचे संवर्धन करताना स्वयंसेवी संस्थांची मार्गदर्शक धोरणे निश्चित करणे इ. सूचना सदस्यांनी केल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणDoulatabad Fortदौलताबाद किल्ला