शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 7:39 PM

रिपब्लिकन पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यास चर्चा 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचीऔरंगाबादेत मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्षाला मनपा निवडणुकीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे; पण एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, तसेच सीएए, एनआरसी व एनपीआरच्या मुद्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी जर भूमिका स्पष्ट केल्या, तर त्यांनाही सोबत घेता येऊ शकेल, असे आज येथे पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी जाहीर केले.

मनपा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी व एमआयएम एकत्रित येण्यावरून सध्या उलटसुलट चर्चा आहे. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर व वंबआच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले की, सर्वच्या सर्व जागा लढण्यासंबंधी व आघाडी करण्यासंबंधी कुठलाच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र, निरीक्षकांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून मुलाखती वगैरे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

खैरलांजी प्रकरण घडले. त्यावेळीही राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील गृहमंत्री होते. आताही गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि सध्याच्या गृहमंत्र्यांनी सिल्लोड- अंधारी प्रकरण घडल्यानंतर जे वक्तव्य केले, त्यावरून पीडितेला न्याय मिळेल, असे वाटत नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. एमआयएमबरोबर आघाडी होईल की नाही; परंतु रिपब्लिकन गटांबरोबर आघाडी होऊ शकणार नाही, काल असे विचारता अंजली आंबेडकर उद्गारल्या, कुठल्या गटाबरोबर. सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवर या गटांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. 

रिपाइं एचे रामदास आठवले हे भाजपबरोबर केंद्रात सत्तेवर आहेत.  त्यामुळे अंजली आंबेडकर यांनी कुठल्या गटाबरोबर, असे विचारून आठवले यांनाच टोला मारला. यावेळी वंबआ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लता बामणे, प्रा. प्रज्ञा साळवे, देवशाला गवांदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका