शालेय साहित्याकडे कोणी फिरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST2021-06-11T04:05:02+5:302021-06-11T04:05:02+5:30
शाळेसाठी लागणारे दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, वॉटर बॅग, गणवेश, शूज, रेनकोट, छत्री यासारख्या वस्तू घेण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या ...

शालेय साहित्याकडे कोणी फिरकेना
शाळेसाठी लागणारे दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, वॉटर बॅग, गणवेश, शूज, रेनकोट, छत्री यासारख्या वस्तू घेण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारपेठेत पालकांची तोबा गर्दी व्हायची. शहरातील विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शैक्षणिक साहित्य देण्याची व्यवस्था केलेली असल्याने कोरोना लाटेच्या विळख्यात स्टेशनरी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. गेल्यावर्षीचे साहित्य बंद शाळा व ऑनलाईन शिक्षणामुळे तसेच दुकानांमध्ये धूळ खात पडून आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने स्टेशनरी साहित्याची विक्री थांबलेली आहे. अभ्यासक्रम बदलला की जुना स्टॉक रद्दीत देण्याशिवाय विक्रेत्यांना पर्याय नसतो. शिक्षण हे महत्त्वाचे असल्याने त्याच्याशी निगडित शालेय साहित्याच्या विक्रीच्या व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळावा असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे.