शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे कृषिमंत्री कोणाला माहिती नाहीत: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:02 IST

''राज्याचे कृषिमंत्री कोण हे कोणालाही माहिती नाही'', आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरुन हल्लाबोल

- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड ( छत्रपती संभाजीनगर) : मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना  नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण सरकारचे कोणीही त्यांच्यासोबत उभे नाही. मागच्या वेळी कृषिमंत्री असलेले यावेळी पालकमंत्री आहेत, ते त्यावेळी देखील फिरकले नाहीत. आता कृषिमंत्री कोणीतरी दुसरे आहे, नाव देखील माहिती नाही राज्याला, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला. 

शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करू नये. माझा पाहणी दौरा जाहीर झाला त्यानंतर आता सरकर सक्रिय झाल्याची टीका ठाकरे यांनी केली. तसेच राष्ट्रपती देखील मराठवाड्यात आहेत, त्यांनी गंभीर पुर परिस्थितीची नोंद घेऊन सूचना कराव्यात अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. 

पैठण तालुक्यात शनिवारी  रविवारी व सोमवारी  पाचोड गावासह  विविध गावात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पाचोड परिसरातील गल्हाटी नदीला महापूर आल्यामुळे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी संजय नागोराव भुमरे पाटील यांची तर चक्क अडीच एकर जमीन खरडून वाहून गेली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी साडे आकरा वाजता पाचोडला आले. आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणचे नुकसानग्रस्त शेतकरी राजेश शेठी व माणिक शेळके शेतात जाऊन पावसाने नुकसान झालेल्या कपाशीची पाहणी केली.

यावेळी शेतकरी माणिक शेळके व राजेश सेठी यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे समोर आपली कैफियत मांडली. तीन दिवस पडलेल्या पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तर माणिक शेळके या शेतकऱ्यांनी सांगितले की, पाचोड ते अंबड रोड झाल्यामुळे बाजूला प्लॉट पडले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पुलाची दुरुस्ती न केल्यामुळे पावसाचे पाणी दरवर्षी माझ्या शेतात येत असल्याने दरवर्षी माझे अतोनात नुकसान होत असल्याचे सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडून पैठण तालुक्यातील नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय गोर्डे, अॅड. बद्रीनारायण भुमरे, माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे, संजय भुमरे, आनिस पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी, अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी