पैसे घेऊनही खरेदीखत नाही; गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 14, 2017 23:56 IST2017-03-14T23:55:14+5:302017-03-14T23:56:37+5:30
तुळजापूर : जमिनीचे खरेदीखत करून देते असे म्हणत ३५ लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पैसे घेऊनही खरेदीखत नाही; गुन्हा दाखल
तुळजापूर : जमिनीचे खरेदीखत करून देते असे म्हणत ३५ लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना १९ मे २०१६ ते मंगळवारपर्यंत तुळजापूर शहरात घडली़ तुळजापूर शहरातील सारा गौरव सोसायटी भागात राहणाऱ्या माया पांडुरंग हुंडेकरी यांना शहरातीलच एका महिलेने त्यांच्या ढेकरी शिवारातील जमीन गट नंबर १८० क्षेत्र दोन हेक्टर २२ आर जमिनीचे खरेदीखत करून देते असे म्हणाली होती़ त्यानंतर माया हुंडेकरी यांनी विश्वासाने त्या महिलेला इसारापोटी ३५ लाख रूपये दिले़ मात्र, त्या महिलेने ढेकरी शिवारातील जमिनीचे उस्मानाबाद येथील एका इसमाच्या नावे खरेदीखत करून दिले़ त्यानंतर माया हुंडेकरी यांनी संबंधित महिलेकडे ‘३५ लाख रूपये परत द्या’ अशी मागणी केली असता त्या महिलेने ‘तुमचे कसले पैसे माहित नाही, तू मला यापुढे पैसे मागितले तर तुला बघून घेते’ अशी धमकी दिल्याची फिर्याद माया हुंडेकरी यांनी तुळजापूर ठाण्यात दिली़ हुंडेकरी यांच्या या फिर्यादीवरून सुनिता नागेश पैलवान (रा़ तुळजापूर) यांच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा तपास सपोनि दासरवाड हे करीत आहेत़