शैक्षणिक शुल्कमाफी नाहीच; परीक्षा फीदेखील परत मिळेना!

By Admin | Updated: June 14, 2016 23:52 IST2016-06-14T23:43:31+5:302016-06-14T23:52:41+5:30

औरंगाबाद : शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही महाविद्यालय आणि विद्यापीठांनी घेतलेली परीक्षा फीसुद्धा बहुसंख्य विद्यार्थ्यांना परत मिळाली नाही.

No educational fees; Get back the exam fee! | शैक्षणिक शुल्कमाफी नाहीच; परीक्षा फीदेखील परत मिळेना!

शैक्षणिक शुल्कमाफी नाहीच; परीक्षा फीदेखील परत मिळेना!

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्कमाफी तर मिळाली नाहीच; परंतु शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही महाविद्यालय आणि विद्यापीठांनी घेतलेली परीक्षा फीसुद्धा बहुसंख्य विद्यार्थ्यांना परत मिळाली नाही. फीमाफीच्या शासनाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबर २०१५ मध्ये राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्याबाबत उच्च शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात संदिग्धता होती. केवळ अनुदानित संस्थांतील ईबीसीधारक विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. या वादविवादात मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आणि स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा या दोन्ही विद्यापीठांच्या अंतर्गत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते. यामुळे हे शुल्क नंतर विद्यार्थ्यांना परत मिळेल, असे विद्यापीठ व महाविद्यालयांनी जाहीर केले. मात्र आता दोन्ही विद्यापीठांचे २०१६-१७ चे शैक्षणिक सत्र सुरूहोत आले तरी गतवर्षीचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळालेले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्ष़ा विभागाला परीक्षा शुुल्क म्हणून चार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 
अद्याप निर्णय नाही
फीमाफीसंदर्भात शासनाकडे आपण निवेदन सादर केले आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. काही विद्यापीठांनी त्यांच्या स्वत:ची गंगाजळी अधिक असल्याने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफी दिली आहे. मात्र ते सर्वांना शक्य नाही. काही कोर्सेसची फी अधिक असल्याने ती विद्यापीठाला माफ करणे शक्य नाही.
- डॉ. के. व्ही. काळे, संचालक, बीसीयूडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

Web Title: No educational fees; Get back the exam fee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.