मुंडेंसोबत युती नव्हे ऋणानुबंध-ठाकरे

By Admin | Updated: October 8, 2014 00:53 IST2014-10-08T00:21:00+5:302014-10-08T00:53:13+5:30

बीड: गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे ऋणानुबंध भावनिक पातळीवरचे होते. युती असताना जागा वाटपाची चर्चा व्हायची आणि ते हक्काने जागा मागायचे.

No alliance with Munde - Thackeray | मुंडेंसोबत युती नव्हे ऋणानुबंध-ठाकरे

मुंडेंसोबत युती नव्हे ऋणानुबंध-ठाकरे


बीड: गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे ऋणानुबंध भावनिक पातळीवरचे होते. युती असताना जागा वाटपाची चर्चा व्हायची आणि ते हक्काने जागा मागायचे. ते असते तर मला बीडला यायची गरज भासली नसती, असे सांगत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यामुळेच परळीत आणि लोकसभेसाठीही आम्ही उमेदवार दिला नाही, असे स्पष्ट केले.
येथील चंपावती मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते़ बीडचे उमेदवार अनिल जगताप, कल्पना नरहिरे, सतीश सोळुंके, अजय दाभाडे, अशोक दहिफळे, उपजिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांची उपस्थिती होती़
ठाकरे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार प्रसंगी त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी माझ्याकडे केली होती़ त्या चौकशीचे पुढे काय झाले ? हे समजू शकले नाही़
लोकसभेसाठी वापर केला
भाजपाचे लोकसभेत केवळ दोन खासदार असताना स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई पोटनिवडणूक जिंकल्यानंतर जाहीर सभेत भाजपा सोबत युती करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २५ वर्ष युती टिकली. सर्व काही योग्य चालले असताना भाजपाने युती तोडण्याचा निर्णय घेऊन काळजात कट्यार घुसविण्याचे काम केले. भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांना मित्र पक्षाची आठवण झाली नाही़ लोकसभेसाठी भाजपाने शिवसेनेचा वापर केला असल्याचा घणघाती आरोपही त्यांनी केला़
मोदीं हे नवीन शहेंशाह
महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करण्याची भाषा भाजपावाले करीत आहेत. एका बाजुला भ्रष्टाचार करणारी काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आहेत तर दुसऱ्या बाजुला अफजल खानच्या संकटाप्रमाणे नवीन शहेंशाह ची फौज आहे. मी भाजपाला अफजल खानची फौज म्हणालो नाही. मी टोपी फेकली तुम्ही का घातली, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, नवीन शहेंशाह असल्याचे ठाकरे यांनी मोदी यांचे नाव न घेता सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे तर परळी विधानसभा मतदार संघासाठी पंकजा पालवे उभ्या आहेत. या दोघी निवडून आल्याच पाहिजेत असे ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारासाठी भाजपाला पाठिंबा तर विधानसभेसाठी नसल्याचा संकेत त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: No alliance with Munde - Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.