‘मनपा नको, सातारा नगर परिषदच हवी’
By Admin | Updated: May 26, 2015 00:52 IST2015-05-26T00:40:25+5:302015-05-26T00:52:31+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी,

‘मनपा नको, सातारा नगर परिषदच हवी’
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी, या मागणीसाठी जोरदार घोषणा देत विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सातारा- देवळाईवासीयांतर्फे सोमवारी बीड बायपासवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे बीड बायपासवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली.
‘आधी शहरातील लोकांना सुविधा पुरवा, मग आमचा विचार करा’, ‘नगर परिषद आमच्या हक्काची’ आंदोलकांनी दिलेल्या अशा घोषणांनी बीड बायपास रोड दणाणून गेला. भर उन्हात आंदोलनात महिला वर्गाचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. प्रारंभी, जोरदार घोषणा देत आंदोलकांनी वाहतूक थांबवली. त्यामुळे बीड बायपासवरील दोन्ही बाजूंनी (पान २ वर)
(पान १ वरून)
वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनकर्ते बाजूला झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होत असताना पुन्हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु पोलिसांनी आंदोलकांना अडविले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. आंदोलनात जावेद पटेल, बाळासाहेब गायकवाड, डॉ. सुदर्शन मुंडे, स्वप्नील, शिरसाट, गजेंद्रसिंग राठोड, रोहन पवार, क्षितिज रोडे, अंकुश दाभाडे, दीपक गायकवाड, अजय चव्हाण, शरद शेवाळे, बाजीराव हिवाळे, अप्पासाहेब शिंदे, विकास कवडे, रुख्मिणी मोगल, रिमन जाधव, शोभा पवार, संध्या गायकवाड, संजीवनी हिवाळे, शेख जिया, शेख अकबर पटेल, सुवर्णा पाटील, नलिनी शेवाळे आदी सहभागी झाले.
जनतेच्या भावनेचा कोणत्याही प्रकारे विचार न करता नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला. महापालिकेत समाविष्ट झालेल्या यापूर्वीच्या गावांचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही.महापालिकेत गेल्यानंतर मिळणारे पाणीही बंद झाले. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्याने सातारा- देवळाईचीही अशीच अवस्था होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.