शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मनपा जमा करणार... जुने कपडे, भांडी, बेडशीट, चप्पला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:37 IST

औरंगाबाद : महापालिका म्हटले तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तुंबलेल्या गटारी, अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदिवे, खराब रस्ते असे चित्र डोळ्यासमोर उभे ...

ठळक मुद्देएक हात मदतीचा : गरजू नागरिकांना साहित्य देण्याचा उपक्रम

औरंगाबाद : महापालिका म्हटले तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तुंबलेल्या गटारी, अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदिवे, खराब रस्ते असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्याचे आद्य कर्तव्य महापालिकेवर आहे. या कामात सपशेल अपयशी ठरलेली महापालिका आता नागरिकांकडून जुने कपडे, भांडी, बेडशीट, चपला जमा करून गरजू नागरिकांना वाटप करणार आहे.शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी शहरात ‘माणुसकीची भिंत’ या नावाने जुने कपडे, गृहोपयोगी वस्तू जमा करून गरजू नागरिकांना दिल्या आहेत. काही स्वंयसेवी संस्था १२ महिने २४ तास याच कामात मग्न आहेत. आता स्वयंसेवी संस्थांचे काम महापालिका करणार असेल तर महापालिकेचे आद्य कर्तव्य असलेली कामे कोण करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, मेअर फेलो यांच्या संकल्पनेतून शहरातील गरजवंतांसाठी महापालिकेने सामाजिक भावनेतून ‘एक हात मदतीचा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. घरात अनेक वस्तू वापराविना पडून असतात. त्याकडे कोणी कधी पाहतही नाही. याच वस्तूंची अनेकांना गरजदेखील असते. जुने वापरण्यायोग्य असलेले कपडे, भांडी, बेडशीट, चपला यासह इतर साहित्य महापालिकेतर्फे जमा केले जाणार असून, नंतर ते गरजूंना वाटप केले जाणार आहे.उपक्रम राबविण्यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काही दिवसांपूर्वी बैठक आयोजित केली होती. यावेळी महापालिका अधिकारी व मेअर्स फेलो यांनी ही योजना सुरू करण्याची सूचना केली होती. या उपक्रमाची जबाबदारी आयुक्तांनी मेअर्स फेलो अशिता गडप्पा, राजेश जाधव, दीपा इंचेकर यांच्यासह उपायुक्त मंजूषा मुथा यांच्यावर सोपविली आहे.१ मेपासून सुरुवातमहापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वापरायोग्य जुन्या वस्तू १ ते ८ मेदरम्यान मुख्यालयातील इमारतीमध्ये सुरक्षा विभागाजवळ उभारण्यात आलेल्या मंडपात आणून द्याव्यात. कामगारदिनी १ मेला मंडप सुरू होईल. त्यानंतर भांडी, बेडशीट, चादर, कपडे, चपला यासह इतर वस्तू वेगवेगळ्या करून गरजूंना वाटप करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSocialसामाजिक