अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा !

By Admin | Updated: December 24, 2014 01:02 IST2014-12-24T00:53:19+5:302014-12-24T01:02:06+5:30

लातूर : महापालिका हद्दीत प्रशासनाने सर्व्हे केला असून २४० अनधिकृत बांधकामे आढळले आहेत. या बांधकामाचा पंचनामा सुरू असून, ६० बांधकामाचा पंचनामा झाला आहे

NMC corporation hammer on unauthorized constructions! | अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा !

अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा !


लातूर : महापालिका हद्दीत प्रशासनाने सर्व्हे केला असून २४० अनधिकृत बांधकामे आढळले आहेत. या बांधकामाचा पंचनामा सुरू असून, ६० बांधकामाचा पंचनामा झाला आहे. याबाबत ४५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ नोटिसा मिळाल्यावरही बांधकाम सुरू असल्याचे आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील़ प्रसंगी अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
लातूर शहरात बांधकाम परवाने बंद असल्याची काही लोकांनी अफवा पसरविली आहे़ नागरिकांनी बांधकामाचा रितसर परवाना दाखल करावा, त्यांची अडवणूक होणार नाही़ अधिकृत प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून शहरात अनधिकृतरित्या बांधकामे वाढली आहेत़ घर खरेदी करीत असताना ग्राहकांनी सर्व कागदपत्रांची पाहणी करून मनपाकडे बांधकामांविषयी खातरजमा करावी़ अनधिकृत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सदनिका खरेदी करू नयेत़ शहरात मनपाने केलेल्या सर्व्हेक्षणात सध्या २४० नवे बांधकाम अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले आहेत़
या बांधकामाचे पंचनामे सुरू करण्यात आले असून ४५ बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ ४
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी चार क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ हे अधिकारी बांधकामाची पाहणी, पंचनामा करतील़ अनधिकृत असलेल्या बांधकामधारकाविरूध्द तक्रार देऊन गुन्हे दाखल करतील़ कलम ५२, ५३,५४ अन्वये क्षेत्रिय अधिकारी उषा शिंदे, सलाऊद्दीन काजी, डी.पी. यादव, विजय माने यांना अधिकार प्रदान करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले़
४याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त जयप्रकाश दांडेगावकर, नगर रचना विभाग प्रमुख जी़ पीक़ाकडे उपस्थित होते़ ४
अधिनियम कलम ५४ अन्वये नोटिसा दिल्या आहेत़ अनाधिकृत बांधकाम संबंधितांनी तात्काळ थांबवावे़ सदरील बांधकामाची फाईल रिवाईज करून नवीन प्लॅन मनपाकडे सादर करावा, त्या प्रस्तावाला विनाविलंब मंजुरी देण्यात येईल़ नोटीस देऊनही काम सुरू ठेवल्याचे आढळून आल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येईल़ गुन्हा सिध्द झाल्यास ३ वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची तरतूद आहे़ नोटिसा बजावूनही काम केल्यास महानगरपालिका प्रशासन ते बांधकाम पाडणार असल्याचे आयुक्त तेलंग यांनी सांगितले़
अनाधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामावरील सदनिका खरेदी करू नयेत़ खरेदी करीत असताना मनपात त्याची नोंद आहे की, नाही़ बांधकाम परवाना घेतला की, नाही हे पहावे. मनपा प्रशासन ग्राहकांना संपूर्ण सहकार्य करील, असे आयुक्त तेलंग म्हणाले़

Web Title: NMC corporation hammer on unauthorized constructions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.