‘जैन दिवाकर’ संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन कोटेचा
By Admin | Updated: January 8, 2017 23:40 IST2017-01-08T23:34:27+5:302017-01-08T23:40:49+5:30
बीड : येथील जैन समाजबांधवांच्या ‘जैन दिवाकर’ शिक्षक प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी रविवारी नितीनचंद्र कोटेचा यांची बिनविरोध वर्णी लागली

‘जैन दिवाकर’ संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन कोटेचा
बीड : येथील जैन समाजबांधवांच्या ‘जैन दिवाकर’ शिक्षक प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी रविवारी नितीनचंद्र कोटेचा यांची बिनविरोध वर्णी लागली. अंतर्गत कलाहामुळे गाजलेल्या या निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष होते.
या संस्थेच्या घटनेप्रमाणे पाच विश्वस्थपद असून माणिकचंद कोटेचा यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त होती. हे पद भरण्यासाठी रविवारी धर्मादाय आयुक्तांच्या रितसर परवानगीने रविवारी जैन भवन येथील संस्था कार्यालयात सभासदांची बैठक बोलावण्यात आली होती. संस्थेचे १३९ सदस्य असून त्या सर्वांना निमंत्रित केले होते. अध्यक्षपदासाठी नितीनचंद्र कोटेचा यांचे नाव पुढे आले. त्यांच्याविरुद्ध कोणाचाही अर्ज आला नाही. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. परस्पर विरोधी तक्रारींमुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
पत्रकार परिषदेत नितीनचंद्र कोटेचा यांनी सभासद व समाजाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली. ३५ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे शैक्षणिक वर्तुळात अपेक्षित कार्य होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, धार्मिक शिक्षण मात्र मोठ्या प्रमाणात दिल्याचा दावा त्यांनी केला. यापुढे इंग्लिश स्कूल व इतर शैक्षणिक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. रतीलाल भंडारी, चंपालाल डुंगरवाल, राजेंद्र मुनोत, पारस बोरा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)