शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या व्हिजनला सुरुंग; औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्याचा घाट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:44 IST

एनएचएआयच्या या प्रकाराविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या आठवड्यात भेटून सगळा प्रकार कानावर घालणार असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

- विकास राऊतऔरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चौपदरीऐवजी द्विपदरी करण्यासाठी एनएचएआयमधील काही महाभागांनी नागपूर क्षेत्रीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २४ एप्रिल २०२२ रोजी पुढच्या दौऱ्यात औरंगाबाद ते पुणे या द्रुतगती मार्गाचे भूमीपूजन करण्याचा शब्द देत औरंगाबाद ते पैठण या सुमारे १६०० कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन केले. त्यांच्या व्हिजनला एनएचएआयमधील काही महाभागांनी सुरुंग लावत नागपूर कार्यालयाशी पत्रव्यवहार करून औरंगाबाद ते पैठण हा महामार्ग १० मीटर दोन्ही बाजूंनी रुंद करावा. जेणेकरून भूसंपादनाचा खर्च वाचेल. तसेच नवीन प्रस्तावित महामार्गाशी औरंगाबाद ते पैठण रस्ता जोडल्यास बहुतांश मार्ग चौपदरी होईल. भूसंपादन, अलायन्मेंटवरून सुरू असलेले वाददेखील होणार नाहीत. अशा आशयाचे पत्र एनएचएआयच्या प्रकल्प कार्यालयाकडून नागपूर कार्यालयाकडे पाठविल्याची चर्चा असून, एनएचएआयच्या अध्यक्षा अलका उपाध्याय यांच्याकडे याबाबत येत्या आठवड्यांत बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

अलायन्मेंट बदलण्याचे अधिकार प्रकल्प संचालक कार्यालयाला नाहीत. यातूनच महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्तावच बदलण्याची भूमिका काही अधिकाऱ्यांनी घेतली असून, तसे क्षेत्रीय व मुख्य कार्यालयापर्यंत पत्राद्वारे कळविण्यात आल्याची चर्चा आहे. कुणाच्या फायद्यासाठी तो महामार्ग नसून औरंगाबाद ते पैठण या पट्ट्यातील उद्योग आणि भक्तांना नाथनगरीपर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी १२ वर्षांनंतर भूमिपूजनाला मुहूर्त लागला. चार वेळा निविदा, दोन डीपीआर होऊनही त्या मार्गातील अडथळे अजून कायम आहेत. सुमारे १०० हेक्टर भूसंपादन, आक्षेप, हरकतींचा निपटारा झाल्यावर निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. याला सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाच आता तो रस्ता १० मीटर म्हणजेच विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ५-५ मीटर रुंदीकरणाचा घाट घालण्यासाठी एनएचएआयमधील काही अधिकारी सरसावले आहेत. जर या अधिकाऱ्यांचे मनसुबे यशस्वी झाले तर औरंगाबाद ते पैठण मार्ग चौपदरी होणार नाही.

प्रकल्प संचालकांची माहिती अशी----प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, १० मीटरमध्येच पैठण रस्ता रूंदीकरण करण्याच्या काही हालचाली सुरू नाहीत. भूसंपादनाच्या अनुषंगाने काही हरकती आल्या आहेत. भूसंपादनामुळे काही वाद होण्याची शक्यता असल्यामुळे द्विपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याबाबत पत्रव्यवहार झाला आहे काय ? याबाबत अधिकृतपणे काही सांगता येणार नाही. जोपर्यंत मुख्यालयाकडून याबाबत काही सूचना येणार नाहीत, तोवर काही सांगता येणार नाही.

कार्यकारी अभियंता काय म्हणतात----कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, मी सुटीवर होतो. असे काही पत्र येथून नागपूर कार्यालयाला गेले आहे की नाही, याची माहिती घेऊनच बोलता येईल. औरंगाबाद ते पुणे या प्रस्तावित रस्त्याच्या घोषणेमुळे औरंगाबाद ते पैठण हा रस्ता १० मीटर रूंद करण्याबाबत पत्र आपल्या स्तरावरून गेले आहे काय? याबाबत पाटील यांनी माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री काय म्हणाले----केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे या द्रुतगती मार्गाची घोषणा करताना औरंगाबाद ते पैठण या महामार्गाचे भूमिपूजन केले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गाचे अलायन्मेट वेगळे आहे. त्याचा पैठणशी काहीही संबंध नाही. औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चौपदरीच होईल, यासाठी मी स्वत: गडकरी यांना दोन दिवसांत भेटेन.

गडकरींना भेटून त्यांच्या कानावर घालणार----औरंगाबाद ते पैठण महामार्ग द्विपदरी करणाच्या हालचाली सुरू झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. जर का रस्ता द्विपदरी करायचा असेल, तर मग आहे तोच रस्ता चांगला आहे. एनएचएआयच्या या प्रकाराविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या आठवड्यात भेटून सगळा प्रकार कानावर घालणार असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग