शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नीती आयोगाने केंंद्र सरकारला न्यायाधिकरण स्थापण्याची केली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:30 IST

शेतीमालाचा दर ठरविण्यासाठी आता कायदेशीर न्यायाधिकरणाची स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे .यावरून नीती आयोगाने केंद्र सरकारला न्यायाधिकरण (ट्रॅब्यूनल) स्थापन करण्याची शिफारस केली आहे. या शिफारसीनुसार शेतकी न्यायाधिकरण स्थापन झाले तर खऱ्या अर्थाने शेतकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटनेचा सुमारे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यास खºया अर्थाने यश येईल, अशी माहिती उच्च न्यायालयातील अ‍ॅड. अजय तल्हार यांनी मंगळवारी (दि.२४ ) पत्र परिषदेत दिली.

ठळक मुद्देनीती आयोगाने केंंद्र सरकारला न्यायाधिकरण स्थापण्याची केली शिफारस

औरंगाबाद: शेतीमालाचा दर ठरविण्यासाठी आता कायदेशीर न्यायाधिकरणाची स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे .यावरून नीती आयोगाने केंद्र सरकारला न्यायाधिकरण (ट्रॅब्यूनल) स्थापन करण्याची शिफारस केली आहे.या शिफारसीनुसार शेतकी न्यायाधिकरण स्थापन झाले तर खऱ्या अर्थाने शेतकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटनेचा सुमारे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यास खºया अर्थाने यश येईल, अशी माहिती उच्च न्यायालयातील अ‍ॅड. अजय तल्हार यांनी मंगळवारी (दि.२४ ) पत्र परिषदेत दिली.जळगाव जिल्ह्यातील कर्की येथील प्रकाश गंभीर महाजन यांनी महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटनेची (मुक्ताईनगर) स्थापना केली. या संघटनेने अ‍ॅड. तल्हार यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यामध्ये केंद्र शासनाला शेतकºयांच्या शेतीमालाला योग्य दर निर्धारण करण्यासाठी (भारतीय संविधानाच्या परिच्छेद ३२३ ब अन्वये) शेतमाल मूल्य निर्धारण न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती केली. जेणेकरून शेतमालाचे मूल्य निर्धारण हे न्यायिक पद्धतीने केले जाईल व शेतकºयांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल.याचिकेमध्ये असेही निदर्शनास आणून दिले की, आतापर्यंत राज्य शासनाची समिती कृषी मालाचे भाव निर्धारित करून किमान उत्पादन खर्च अधिक १५ टक्के नफा मिळवत केंद्र शासनाकडे किमतीची शिफारस करते. आंतरराष्ट्रीय मूल्य विचारात घेऊन, किंमत ४० ते ५० टक्के कमी करून, शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करत असते. त्यामुळे उत्पन्न कमी व खर्च जास्त असा आतबट्ट्याचा व्यवहार होत असे. अर्थात त्यामुळे शेतकºयांना अंदाजे ३० ते ३५ टक्के तोटा होत होता.या जनहित याचिकेवर २० डिसेंबर २०१८ रोजी खंडपीठात सुनावणी झाली असता, केंद्र शासनाचे असिस्टंंट सॉलिसिटर जनरल यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, नीती आयोगाने सध्याच्या प्रचलित शेतमाल मूल्य निर्धारण समितीऐवजी शेतकरी न्यायाधिकरणाची स्थापना करण्याची शिफारस केली आहे. जेणेकरून शेतमालाचे मूल्य निर्धारण हे न्यायिक पद्धतीने करता येईल. या शिफारसीमुळे याचिकाकर्ते यांच्या मागण्या केंद्र शासनाकडे विचारार्थ आहेत, असे सकृतदर्शनी न्यायालयाचे मत झाले. त्या आधारे उच्च न्यायालयाने सदरील जनहित याचिका निकाली काढली. जर केंद्र शासनाने योग्य वेळेत सदरील प्रकरणी पुढील कारवाई केली नाही, तर याचिकाकर्ते पुनश्च उच्च न्यायालयात दाद मागू शकतील, अशी मुभा न्यायालयाने याचिकर्त्यास दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयFarmerशेतकरी