जातीवाचक शिवीगाळ करीत एकावर चाकूने हल्ला
By Admin | Updated: July 17, 2014 00:27 IST2014-07-16T23:57:45+5:302014-07-17T00:27:43+5:30
हट्टा : जातीवाचक शिवीगाळ करीत संगणमत करून चाकूने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या बाजूकडून दोघांनी मिळून एकास मारहाण केली आहे.

जातीवाचक शिवीगाळ करीत एकावर चाकूने हल्ला
हट्टा : जातीवाचक शिवीगाळ करीत संगणमत करून चाकूने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या बाजूकडून दोघांनी मिळून एकास मारहाण केली आहे. त्यानंतर दोन्हीकडून आलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून वसमत पोलिसात दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जुलै रोजी वसमत तालुक्यातील रेऊलगावात ही घटना घडली.
वसमत तालुक्यातील रेऊलगाव येथील दत्तराव दुलबाजी सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली. त्यात सुर्यवंशी यांनी पाणंद रस्त्यावर बांधलेल्या बैलास एकाने फावड्याने मारहाण केली. या मारहाणीची विचारपूस करण्यासाठी बोलविलेल्या ग्रामस्थांसमोर बब्रूधन मुंजाजी फेगडे, दशरथ बालाजी फेगडे, अंगद बालाजी फेगडे, बालाजी जळबाजी फेगडे, वसंतराव मुंजाजी फेगडे, भागवत प्रल्हाद फेगडे, अच्च्युत मुंजाजी फेगडे, प्रल्हाद मुंजाजी फेगडे यांनी जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. दरम्यान मारहाण करीत चाकुने हल्ला केल्यामुळे बबन मुंजाजी सुर्यवंशी गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर वसमत पोलिसांनी आठही आरोपींविरूद्ध आॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात अच्चुत प्रल्हाद फेगडे यांनी फिर्याद दिली आहे. यात पाणंद रस्त्याच्या कारणावरून दोघांनी संगणमत केले. दरम्यान वाद घालीत डोक्यात दगड मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी मिलींद प्रल्हाद सुर्यवंशी, माधव बबन सुर्यवंशी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)